शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या हस्ते खेरवाडी येथे विकासकामांचे उद्धाटन

शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या हस्ते खेरवाडी येथे विकासकामांचे उद्धाटन

समाधान भाऊसाहेब कोकाटे
बाळकडु पत्रकार : निफाड तालुका

निफाड : निफाड तालुक्यातील खेरवाडी कामाचा प्रारंभ अनिल आण्णा कदम याच्या हस्ते रविवार(दि.१७) रोजी  करण्यात आला या वेळी ‘आमदार अनिल कदम’ यांच्या हस्ते खेरवाडी येथे विविध विकास कामांचे तसेच शिवसेना युवासेना शाखांचे उद्धाटन मोठ्या प्रमाणात केले आज खेरवाडी येथे ओढे रस्ता उद्धाटन आणि स्मशानभुमी प्लेवर ब्लाक लोकार्पन व नवीन यूवासेना तसेच शिवसेना शाखा तसेच पंचायत समिती सदस्या सौ.रत्नाताई शंकर संगमनेरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्धाटन *शिवसेना आमदार अनिल कदम* यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्धाटन प्रसंगी जि. प. सदस्य दिपकभाऊ शिरसाठ,शिवसेना जिल्हा उपप्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख सुधीरभाऊ कराड , उपतालुकाप्रमुख प्रदिपभाऊ आहिरे , पं.स. सभापती पंडित आहेर , सदस्य शिवाभाऊ सुरासे, शहाजी राजोळे , सोमनाथ आबा पानगव्हाणे , नंदूभाऊ पवार , चारोस्कर बाबा  यांसह परिसरातील व खेरवाडी येथील  ग्रा.पं. सरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे सत्कार व स्वागत पं. स.सदस्या सौ. रत्नाताई शंकर संगमनेरे , सरपंच चिंधूबाबा गांगुर्डे , उपसरपंच सौ.अलका रमेश संगमनेरे , सदस्य , सोसा. चेरअरमन सोमनाथ काका संगमनेरे , उपसभापती शार्दूल बाबा यांसह संचालक मंडळ , शिवसेना युवासेना शाखा प्रमुख उपप्रमुख यांसह इतर पदाधिकारी , जेष्ठ शिवसैनिक व ग्रामस्थांनी केले.  या प्रसंगी आ.कदम यांनी खेरवाडीला अँब्युलंन्स सह स्मशानभूमी साठी निधी देण्याचे व खेरवाडी चितेगाव रस्त्यांसाठी मंजूरी झाल्याचे व काम लवकरच  पुर्ण होण्याची माहिती ग्रामस्थांना दिली.