लासलगावी भव्य त्रिदिनी किर्तन महोत्सवाची सांगता

बाळकडू नेटवर्क
नाशिक जिल्हा/ वार्ताहार/खेडलेझुंगे
ओम साई गणेश मित्र मंडळ, नंदनगर लासलगांव हे नियमित विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. गणेश उत्सवामध्ये इतर सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम, विविध व्याख्यानमाला, अधिकारी वर्ग यांचे नागरिकांना मार्गदर्शनपर विविध उपक्रम, स्वछता मोहीम, वृक्ष लागवड आणि इतर सामाजिक संदेश देण्याचे अविरत कार्य करत असतात.
गनेश उत्सवानिमित्त मागील चार वर्षांपासून भव्य त्रिदिनी कीर्तन मालेचे आयोजन या मंडळाकडून केले जात आहे.
याही वर्षी दिनांक २५/०५/२०१९ ते २८/०५/२०१९ दरम्यान साडेतीन दिवसांचा भव्य सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता. सप्ताहाचे हे ४ थे वर्ष असुन मार्गदर्शक रामायणाचार्य हभप सौ. सुवर्णामाई अनिल महाराज जमधडे, येवला यांचे लाभले होते.
पाहिल्या दिवसाची सेवा शनिवार दिनांक २५/०५/२०१९ रोजी समाजप्रबोधनकार हभप कु. ज्योतीताई जगताप (वाकी), यांच्या सुश्राव्य  वाणीतून पार पडली. त्यांनी नामपर प्रकरणातील संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील सदा नामघोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, या अभंग घेऊन कलयुगामध्ये फक्त नामच एक प्रभावी साधन असून ते कसे ते त्यांच्या सुमधुर वाणीतून पटवून दिले तसेच
रविवार दिनांक २६/०५/२०१९ रोजी हभप विश्वनाथ महाराज कोल्हे (चिखल ओहोळ)
यावेळी विशेष उपस्थिती हभप शांताराम महाराज दुसाने, नाशिक जिल्हा वारकरी साहित्य परिषद पुणे, टिव्हीस्टार निलेश महाराज पवार, लासलगाव, झी टॉकीजफेम जुगलबंदी कीर्तनकार हभप कु. मुक्ताई चाळक, शिरूर, यांचे वडील हभप काकासाहेब महाराज चाळक, हभप बाजीराव महाराज पाचपुते, पाटोदा,
सोमवार दिनांक २७/०५/२०१९ रोजी भागवताचार्य-गाणकोकीळा हभप कु. साध्वी सोनाली दीदी कर्पे (चकलंबा, गेवराई) यांच्या सुमधून वाणीतून श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अफजल खान वध यावर पोवाडा म्हणून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विशेष उपस्थिती  हभप संजीवनी ताई गडाख, नांदगाव, अखिल भारतीय महिला वारकरी नाशिक जिल्हा उपाध्यक्षा, हभप ज्योतीताई जगताप, वाकी, हभप बाजीराव महाराज पाचपुते, हभप भाऊसाहेब महाराज जाधव, हभप नवनाथ महाराज बोरगुडे, हभप ताजने अप्पा, यांची उपस्थिती लाभली होती. मंगळवार दिनांक २८/०५/२०१८ रोजी भागवताचार्य हभप अनिल महाराज जमधडे, येवला यांच्या काल्याच्या किर्तना नंतर दुपारी १२ ते ३ दरम्यान महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विशेष उपस्थिती वासुदेव नंदगिरी बहुरुपी महाराज, लासलगाव, हभप अलकाताई पवार , चांदवड, टीव्ही स्टार निलेश महाराज पवार, लासलगाव यांची होती.
तसेच यावर्षीच्या कार्यक्रम दरम्यान जम्मु येथील पुलवामा व गडचिरोली येथे नक्षली भुसुरंग स्फोटातच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या आपल्या वीर जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमास गायनाचार्य म्हणून हभप प्रकाश महाराज नाईकवाडे, हभप नागनाथ महाराज गोरडे, मोनिका ताई जाधव, राणीताई दौंड, हभप ज्योतीताई बिडकर, मृदुंगाचार्य म्हणून हभप बाळा महाराज विघनवाडीकर आणि हभप ओंकार महाराज ताजने, हार्मोनियम वादक क्षिरसागर काका, भालदार चोपदार म्हणून हभप दिगंबर महाराज पाटील, हभप दत्तात्रय पाटील राणवडकर आणि लासलगाव, टाकळी, आंबेगाव, वेळापूर, ब्राम्हणगाव विंचूर, वाहेगाव येतील भजनी मंडळांची तर स्वामी मुक्तनंद साउंड सिस्टीम सुकी, येवला यांची साथ लाभली. येणेप्रमाणे त्रिदिनी कीर्तन महोत्सव आनंदात पार पडला.
बाबा गिते
देवगाव जिल्हा परिषद गट,