सर्वे रस्त्यालगत सरंक्षक कठड्यांची दुरावस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

बाळकडू वृत्तसेवा रायगड मुरुड जंजिरा , ता.२६(बाबूराव गोळे )

साळाव- मुरुड रस्त्यावर सर्वे डोंगर रस्त्यालगत असलेल्या संरक्षक कठड्यांची पार दुरावस्था झालेली असून याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून दुरुस्तीची मागणी   प्रवासी व वाहनचालक करीत आहेे .
साळाव-मुरुड रस्त्यावर सर्वे रस्त्यालगत असलेले संरक्षक कठड्यांची गेल्या अनेक महिन्यांपासून पार दुरावस्था झालेली आहे. मुरुड-जंजिरा पर्यटनात या रस्त्यावर सातत्याने वाढती वर्दळ असते.शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी याठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. याठिकाणी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन कठड्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी यांनी यात लक्ष पुरवून याठिकाणी संरक्षित कठड्यांची दुरुस्ती करण्यात यावी.अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.