पनवेल तालुक्यात शेकाप च्या गोटात आत्मचिंतन करण्याची गरज

श्री.नंदु वारुंगसे
बाळकडू विभाग प्रतिनिधी
दिनांक २५/०५/२०१९
मावळ लोकसभा मतदार सांगतील पनवेल विधानसभा मतदार संगातून २०१९ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांना दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच ५४ हजार ६५८ मताधिक्य मिळवून देण्यात भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर व शिव सेना,भाजप ला यश आले आहे.स्वाभाविकच पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांचे एक हाती असलेले वर्चस्व दिसून आले आहे.
एक काळ असा होता कि संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष आपले अस्तित्व टिकून होता.विधान सभेतील विरोधी पक्ष नेतेपद अनेक वर्ष या पक्षा कडे होते,१९९८ साली वाजपेयी सरकार आपल्या एका मताने पाडून इतिहास घडवणारे रामशेठ ठाकूर १९९९ च्या निवडणुकीतही पुन्हा शेतकरी कामगार पक्षातर्फेच लोकसभेवर निवडून आले; पण यापुढे अधिक काळ शेकापचे राजकारण करणे आपल्याला शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन रामशेठ ठाकूर यांनी २००४ ची लोकसभा निवडणूक शेकापतर्फे लढवण्यास नकार देऊन त्याच वर्षी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या काळात रामशेठ ठाकूर हेच रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख आधारस्तंभ झाले व प्रशांत ठाकूर यांच्या साठी आमदारकीची उमेदवारी मिळवून देण्यात ,त्यांना निवडून आणण्यात यशस्वी झाले.तेव्हा पासून ठाकूर कुटूंबीयांचे वर्चस्व दिवसेन दिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.पुन्हा काँग्रेस मध्ये आमदार असल्याने २०१४ मध्ये  खारघर टोल चा मुद्दा उचलून खारघर टोल नाका रद्द करण्यावरून आमदार प्रशांत ठाकूर आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात खडाजंगी सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या दफ्तर दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.त्यांच्या राजीनाम्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यासाठी पनवेलमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशांत ठाकूर यांनी  विधानसभा निवडणूक लढवण्यास होकार दर्शविला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकूर यांनी काँग्रेस पक्षावर टीका न करता मुख्यमंत्र्यांच्या कार्यपध्दतीवर तोंडसुख घेतले. तसेच यापुढे काँग्रेसश्रेष्ठींपुढे नाक घासणार नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आमदारकी लढविण्यासाठी त्यांनी भाजपचे दरवाजे ठोठावले, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.व काँग्रेस पक्षा मधून असंक्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.थेट भाजप मधून विधान सभा जिंकण्याची किमया करणाऱ्या प्रशांत ठाकूर यांनी आपली पुढील अचूक रणनीती ओळखून शहरी भागावर मजबूत पकड करून.मावळ लोकसभा मतदार संघातील २०१९ चे  शिवसेना, भाजप व आर. पी. आय. महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग अप्पा बारणे यांना ऐतिहासिक विजय मिळवून देऊन २०१९ चा विधान सभेचा मार्ग सुखकर केला आहे.असे जाणकारांचे मत आहे.
श्री.नंदु वारुंगसे
बाळकडू विभाग प्रतिनिधी
मोबाईल नंबर-९५९४९४६०४४
ई-मेल- nandu8311@gmail.com