सोलापूर व मध्यात भाजपचा विजय. युवासेनेचा विजयी  जल्लोष

बाळकडू वृत्तपत्र-सोलापूर जिल्हा
सोलापुर,ता:२४ सोलापुर ,माढा व धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार जयसिद्धेश्वर महाराज,रणजितसिंह निंबाळकर व  ओमराजे निंबाळक र यांच्या विजयनिमित्त युवासेनेकडून पार्क चौक येथे मिठाई वाटप करीत जल्लोष करत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाबद्दल घोषणा देण्यात आल्या.
यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे म्हणाले , भाजपा सेना युतीच्या विजयाचे खरे शिल्पकार महायुतीचे कार्यकर्ते असून जनतेने विकासाच्या बाजुने दिलेला कौल आहे.
यावेळी युवासेना शहरप्रमुख विठ्ठल वानकर म्हणाले की हा जनतेचा कौल म्हणजे सकारात्मक राजकारणाचा विजय आहे.
यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक सुमित साळुंखे , उपशह र प्रमुख लहु गायक वाड , प्रसाद नीळ ,गुरुनाथ शिंदे  काशी विभुते, विषाल पवार अरूण जाधव ,संतोष चव्हाण , शेख स र  बाबूशा यादोडे सह आदि युवा सैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बाळकडू वृत्तपत्र-
साहेबराव भारत परबत
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मो-९६०४२४३०४१