सुर्डीत ओमराजे निंबाळकरांच्या विजयाने तरुणांचा आनंदोत्सव

बाळकडू वृत्तपत्र-सोलापूर जिल्हा
सुर्डी,ता.२४ धाराशिव लोकसभा मतदारसंघातुन ओमराजे यांनी निर्णायक आघाडी घेतली की बार्शी तालुक्यातील सुर्डी गावातील तरुणांनी  गुलाल, फटाके, पेढे वाटून आपल्या नेत्याचा विजयी जल्लोष साजरा केला
बार्शी तालुक्यातून निर्णायक मताधिक्य देऊन विजयाचा मार्ग सुकर केला.
    मा आमदार राजाभाऊ राऊत यांनी  बार्शी तालुक्यात एक ही स्टार प्रचारक न बोलवता कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकारीच्या जोरावर तालुका पिंजून काढला होता पंचायत समिती सदस्य, बाजार समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य यांनी प्रचारात आघाडीवर राहून विजयी मार्ग सुकर केला.सुर्डीत युवक वर्गाने केलेला जल्लोष जोतिराम परबत,समाधान शेळके,प्रमोद शेळके,प्रमोद डोईफोडे, गणेश शेळके, दादा शेळके, विशाल डोईफोडे, बळी डोईफोडे, बंटी डोईफोडे,विजय भडकवड अजय भडकवाड  युवकांनी जल्लोष केला.
बाळकडू वृत्तपत्र
साहेबराव परबत
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मो ९६०४२४३०४१