नागपूरात कमळ , तर रामटेक मध्ये धनुष्यबाणचा बोलबाला 

बाळकडू वृत्तपत्र : नागपूर  जिल्हा नागपूर
दिनांक २३/०५/२०१९
निवडणूकीचा शेवटचा टप्पा पार पडताच विविध वृत्तसंस्थांच्या एक्झिट पोलने आप आपली मते मांडली व चर्चेला उधाण आले मात्र आज आलेल्या निकालामुळे एक्झिट पोलचे एक्झाट पोलमध्ये रूपांतर झाले
  नागपूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना ११४९७२ मतांनी पराभूत करून विजय प्राप्त केला नितीन गडकरी   यांना ६५७४६९ तर नाना पटोले यांना ४४२४९७ मते मिळाली
रामटेक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कृपाल तुमाने विजयी झाले त्यानी काँग्रेसच्या किशोर गजभिये यांचा १२०२०८ मतांनी पराभव केला कृपाल तुमाने यांना ५६५३६० तर गजभिये यांनी ४४५१५२ मते मिळवली पुर्वी हे दोन्ही मतदार संघ कांग्रेस चा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे
         नितीन गडकरी यांनी नागपूरच्या मतदारांना धन्यवाद दिले व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ मला मिळाले असे आभार व्यक्त केले तर कृपाल तुमाने यांनी आपल्या यशाचे श्रेय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व रामटेक च्या मतदारांना व कार्यकर्ते यांना दिले.
एम. जमील शेख
बाळकडू प्रतिनिधी
९१३०३८५६८९