विनायक कदम यांचे शिरोळ तहसील समोर उपोषण

शिरोळ ता.कोल्हापूर :-
दैनिक बाळकडू चे शिरोळ तालुका प्रतिनिधी विनायक कदम यांनी त्यांच्या टाकवडे गावातील रस्ता अतिक्रमण प्रश्ना विषयी आज शिरोळ पंचायत समिती, तहसील कार्यालया समोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या उपोषणास भेट देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख सतिश मलमे साहेब. आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते व विविध दैनिकाच्या पत्रकारांनी भेट दिली.
ग्रामसेवक आदलिंग, विस्तार अधिकारी विकास कांबळे यांनी भेट दिली.
तसेच बाळासो घोरपडे, भूपाल मनगुतकर, मनोहर निर्मल, सचिन पाटील, दिनकर पाटील, संजय कदम, रोहित पाटील, प्रफुल्ल कांबळे, मंगेश भंडारे या सर्वांनी उपोषणास भेट दिली.