बँक ऑफ महाराष्ट्र च्या ४१ वर्षाच्या सेवेतून बबन वाघमारे सेवानिवृत्त

बँक ऑफ महाराष्ट्र च्या ४१ वर्षाच्या सेवेतून बबन वाघमारे सेवानिवृत्त
O दिपक खरात
केम (सोलापूर) :- केम ता.करमाळा येथील बबन महादेव वाघमारे हे बँक ऑफ महाराष्ट्र च्या ४१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झाले. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र च्या केेम ता.करमाळा जि.सोलापूर या एकाच गावात सलग ४१ वर्ष सेवा केली.
या सेवाकाळात त्यांनी इनामे इतबारे बँकेची नोकरी केली. बँकेच्या अधिकारी वर्गाची तसेच खातेदारांची मने जिंकली.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा केेम यांच्या वतीने आज विठ्ठल मंदिर केम येथे त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी त्यांचा बँकेचा वतीने, ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बबन वाघमारे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास केम गावतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय वासकर होते. बँक ब्रांच मॅनेजर सचिन खोचरे साहेब, करमाळा पंचायत समिती सभापती शेखर गाडे, जिल्हा परिषद सदस्य अनिरुध्द कांबळे, केम गावचे सरपंच आकाश भोसले, कुंकू कारखानदार असोसिएशन चे अध्यक्ष विठ्ठल भिस्ते, अरुण कांबळे, बाळू लोखंडे, किरण ठवाल, यांच्यासह बहुसंख्य कुंकू कारखानदार, व्यापारी वर्ग, विविध सोसायटी चे चेअरमन, किराणा दुकाने मालक, शिक्षक वर्ग बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.
आभार संजयकुमार वाघमारे यांनी व्यक्त केले. सत्कार मूर्ती च्या वतीने गावकऱ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी अनिल वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, संतोष वाघमारे, विश्वासराव वाघमारे सर्व वाघमारे परिवार यांनी कष्ट घेतले.