जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पहिले गोल रिंगण बेलवाडीत उत्साहात, आनंदात संपन्न.. || बेलवाडी झाली विठ्ठलमय. || गोल रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा उपस्थित जनसमुदायाने ‘याची देही याची डोळा’ पाहिला. || इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रिंगण अश्वाचे पूजन. || “शेतकरी सुखी व्हावा, हेच विठूराया चरणी मागणे

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पहिले गोल रिंगण बेलवाडीत उत्साहात, आनंदात संपन्न..

बेलवाडी झाली विठ्ठलमय. गोल रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा उपस्थित जनसमुदायाने ‘याची देही याची डोळा’ पाहिला.

इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रिंगण अश्वाचे पूजन. “शेतकरी सुखी व्हावा, हेच विठूराया चरणी मागणे

O प्रसाद तेरखेडकर

वालचंदनगर (पुणे) :-

श्री.क्षेत्र देहू येथून विठ्ठल भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण बेलवाडी (ता.इंदापूर) येथे गुरुवारी (दि.४) रोजी सकाळी मोठ्या उस्ताहत व आनंदी वातावरणात पार पडले.

सणसर येथील मुक्काम आटोपून जगदगुरूंची पालखी गुरुवारी सकाळी ७:३५ वा. बेलवाडी येथील पालखी मैदानावर येताच ग्रामस्थांनी परंपरेनुसार जोरदार स्वागत केले. रिंगण अश्वाचे पूजन इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर तेथील मेंढ्यानी पालखीला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर झेंडेकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी यांनी हरिनामाचा गजर करीत पालखी प्रदक्षिणा पूर्ण केली. विणेकरी हरीभक्तांनी विठ्ठलनामाच्या गजरात प्रदक्षिणा पूर्ण केली. यानंतर मानाच्या अश्वाची भरधाव वेगात पालखी प्रदक्षिणा सुरु झाली. अश्वाने पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी ज्ञानोबा तुकाराम, पंढरीनाथ महाराज कि जय च्या नामघोषाने बेलवाडी रिंगण तालावरील वातावरण विठ्ठलमय झाले होते. गोल रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा उपस्थित जनसमुदायाने ‘याची देही याची डोळा’ पहिला.

बेलवाडी येथे होणारे हे जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होते. पालखी सोहळ्याची बांधणी अत्यंत शिस्तबद्ध व सुनियोजित होती. पालखी बरोबरीने ३०० दिंड्या चालत आहेत. या रिंगण सोहळ्याचे नियोजन शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत बेलवाडी व ग्रामस्थ यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले होते.

बेलवाडी च्या रिंगण सोहळ्यानंतर दुपारच्या विश्रांती साठी पालखीने  अंथुर्ने गावाकडे प्रस्थान केले. वाटेत चिखली फाटा, लासुर्णे, जंक्शन, येथे विविध संघटनांनी पालखीचे स्वागत केले. आज गुरुवार रात्रीचा मुक्काम निमगाव केतकी येथे होणार आहे. “शेतकरी सुखी व्हावा, पाऊस चांगला पडावा” हेच मागणे विठूराया चरणी मागण्यासाठी पायी वारी करीत असल्याचे असल्याची भावना सोहळ्यातील वारकर्यांनी व्यक्त केली.

ऑनलाईन लिंक :- www.balkadu.com/10233