राज्य दैनिक ” बाळकडू ” वृत्तपत्रासाठी पत्रकार पाहिजेत. (नियुक्तीपत्र, ओळखपत्र, प्रशिक्षण व मानधन दिले जाईल.) नियम, कामाची पद्धत, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हि लिंक उघडून अवश्य वाचा.

राज्य दैनिक ” बाळकडू ” वृत्तपत्र
daily BALKADU newspaper

[ निवेदन :-  ‘हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे’ यांच्या विचारांच्या प्रेरणेतून राज्य दैनिक ‘बाळकडू’ हे वृत्तपत्र सुरु केलेले आहे. मात्र दैनिक बाळकडू हे वृत्तपत्र  कोणत्याही राजकीय पक्षाशी संबधित नाही. दैनिक बाळकडू हे पूर्णपणे स्वतंत्र, नि:पक्ष व सर्वसमावेशक वृत्तपत्र आहे. ]

राज्य दैनिक “बाळकडू” वृत्तपत्र  गुरुवार दिनांक २१ मार्च २०१९ (धुलीवंदन) या दिवसापासून महाराष्ट्रभर सुरु करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्यात विस्तारत असलेल्या दैनिक बाळकडू वृत्तपत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, शहरांमधून, गावांमधून पत्रकार नियुक्ती केली जात आहे.
दैनिक बाळकडू वृत्तपत्राच्या माध्यमातून स्वतःची पत्रकार म्हणून नवी ओळख निर्माण करण्याची हि सुवर्णसंधी आहे. इच्छूक स्त्री / पुरुष पत्रकारांनी तत्काळ संपर्क करावा.

मित्रांनो ….
मला माझ्या पत्रकार टीम मध्ये टाईमपास करणारी, आळशी, कामचोर आणि ढोंगी माणसे नको आहेत. मेहनत करणारी, समर्पित असणारी, एकाग्रचित्त असणारी, महत्वाकांक्षा बाळगणारी, संकल्पवान आणि ज्यांना चांगला, उत्तम पत्रकार होण्याची इच्छा आहे अशी माणसे मला माझ्या पत्रकार टीम मध्ये हवी आहेत. आपण राज्य दैनिक बाळकडू साठी पत्रकार होण्यास इच्छुक असाल तर आपले मनापासून स्वागत आहे. लवकरात लवकर बाळकडू पत्रकार टीम मध्ये सामील व्हावे. आपले भविष्य नक्कीच उज्वल आहे.
…. संपादक दिपक खरात 

बाळकडू पत्रकारांना मिळणाऱ्या गोष्टी खालील प्रमाणे…
(१) नियुक्तीपत्र – ५ वर्षासाठी 
(२) ओळखपत्र – ५ वर्षासाठी 
(३) पत्रकारिता प्रशिक्षण व प्रमाणपत्र    
(४) मानधन – दरमहा १००० रुपये 

दैनिक बाळकडू साठी पत्रकार होण्याची पात्रता
(१) पत्रकार होण्याची इच्छा व आवड असावी.
(२) शिक्षण किमान १२ वी उत्तीर्ण असावे.
(३) वय १८ वर्षे पूर्ण असावे.
(४) सोशल मिडिया चा वापर करता येत असावा. (फेसबुक, व्हॉट्सअँप, इमेल इत्यादी)
(५) अंगी प्रामाणिकपणा असावा. बाळकडू संस्थापक / संपादकाच्या सूचनेनुसार काम करण्याची तयारी असावी. 
(वरील १ ते ५ मुद्दे आवश्यक आहेत. खालील ६ व ७ मुद्दे नसतील तरी चालेल.)
(६) पत्रकारिता, जर्नालिझम कोर्स झालेला असेल तर अत्यंत उत्तम. 
(७) अनुभव – इतर पेपरला काम केले असेल किंवा आता करीत असाल तर उत्तम.

दैनिक बाळकडू पत्रकार होण्यासाठी काय करावे
(१) प्रोसेस फी २००० रुपये + प्रिंट पेपर सभासद फी १००० रुपये  = एकूण ३००० रुपये भरावे लागतील.
(२) सदर ३००० रुपये हि रक्कम विनापरतावा (नॉन रिफंडेबल) स्वरुपात घेतली जात असल्याने परत मिळणार नाहीत.
(३) सदर ३००० रुपये दैनिक बाळकडू संपादक यांच्याकडे पाठवावेत.
(४) पैसे पाठविल्यावर संस्थापक / संपादक बाळकडू यांना फोन करून पैसे पोहचले कि नाही याची खातरजमा करून घेणे.
(५) फोन पे, तेज अँँप, गुगल पे, पेटीयम यावरून पैसे पाठवू शकता. त्यासाठी 9623304007 हा नंबर आहे. 
(६) बँक ऑफ महाराष्ट्र च्या खात्यावर पैसे पाठवू शकता.
खातेदार :- दिपक पोपट खरात   dipak popat kharat 
खाते नंबर :- 60170837693 
IFSC.कोड :- MAHB0000828 

ट्रेनी पत्रकार 
(१) ३००० रुपये भरल्या नंतर आपणास बाळकडू च्या पत्रकार ग्रुप मध्ये घेतले जाईल.
(२) त्यानंतर ५० दिवसांसाठी ट्रेनी पत्रकार कालावधी असेल.
(३) ५० दिवसांच्या ट्रेनी पत्रकार कालावधी मध्ये चांगले काम दाखविणाऱ्या उत्कृष्ट ट्रेनी पत्रकारांना ‘महाराष्ट्र देशा’ पुस्तक विशेष भेट स्वरुपात दिले जाईल. 
(४) ‘ट्रेनी पत्रकार’ च्या ५० दिवस कालावधीत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास पुढील नियुक्ती केली जाणार नाही. पत्रकार नेमणूक रद्द केली जाईल.

पत्रकारिता प्रशिक्षण व प्रमाणपत्र 
(१) ट्रेनी कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पत्रकारिता प्रशिक्षण दिले जाईल. त्याचे नियोजन त्या त्या वेळी सांगितले जाईल.
(२) तसेच विभाग निहाय प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक वर्ग देखील घेतला जाईल. त्याचे नियोजन त्या त्या वेळी सांगितले जाईल.
(३) या कालावधीत काही प्रत्यक्ष कामाचे टास्क / टार्गेट / कृती दिली जाईल.
(४) प्रशिक्षणासाठी एक २०० पानी मोठी वही करावी. प्रशिक्षणाशी संबधित त्यामध्ये लिखाण केले जावे.
(५) प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण वहीवर संपादक बाळकडू यांचा रिमार्क घेतला जावा.
(६) या कालावधीत पत्रकारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जातील.
(७) पत्रकारिता प्रशिक्षण योग्यरित्या पूर्ण केल्यावर “पत्रकारिता प्रशिक्षण प्रमाणपत्र” देण्यात येईल.

बाळकडू अधिकृत पत्रकार 
(१) ‘ट्रेनी पत्रकार’ च्या ५० दिवस कालावधीत सकारात्मक प्रतिसाद देवून पत्रकारिता प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पत्रकार अधिकृत होतील.
(२) अधिकृत पत्रकारांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतचे पाच वर्षासाठी ओळखपत्र व नियुक्तीपत्र देण्यात येईल.
(३) डेटलाईन / पद / कार्यक्षेत्र :-  शालेय शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पत्रकारिता प्रशिक्षण, कामाचा अनुभव, मुलाखत, बाळकडू साठी प्रामाणिकपणे दिलेले योगदान या बाबींचा विचार करून पत्रकारांची पदे व कार्यक्षेत्र जाहीर करण्यात येतील.
(४) विभागवार किंवा जिल्हानिहाय पत्रकार संमेलन घेवून त्यामध्ये पत्रकारांना सन्मानपूर्वक ‘ओळखपत्र, नियुक्तीपत्र, पत्रकारिता प्रमाणपत्र व भेटवस्तू’ देण्यात येईल.
(५) अधिकृत पत्रकार मानधन व दिवाळी बोनस मिळविण्यास पात्र राहतील.

मानधन 
(१) दरमहा एक हजार रुपये मानधन दिले जाईल.
(२) मानधन दरमहा सात तारखेला बँक खात्यावर जमा केले जाईल.
(३) मानधन मिळविण्यासाठी दरमहा किमान दहा बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात.
(४) मानधन मिळविण्यासाठी पत्रकाराने दरमहा पाच हजार रुपयांची जाहिरात मिळवून देणे आवश्यक आहे.
(५) बातम्या व जाहिरात यांचे टार्गेट पूर्ण झाले तरच मानधन मिळेल. अन्यथा मानधन मिळणार नाही.

जाहिरात
(१) बाळकडू पत्रकार हे अधिकृत जाहिरात एजंट सुद्धा असतील.
(२) पत्रकारास जाहिरात कमिशन २० % इतके राहील.
(३) जाहिरात कमिशन दरमहा पाच तारखेला खात्यावर जमा केले जाईल.
(४) दरमहा कमीत कमी दोनशे रुपयांची जाहिरात मिळवून देणे आवश्यक आहे. 
(५) जास्तीत जास्त कितीही जाहिरात मिळवू शकता.
(६) पाच हजार रुपयांच्या जाहिरातीचा टप्पा ओलांडला तर मानधन १००० रुपये दिले जाईल. + २० % कमिशन सुद्धा दिले जाईल.
(७) जाहिरात दिल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला पाहिजे.
(८) जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी जाहिरातीचे पैसे जमा केले पाहिजेत.

बातमी
(१) बाळकडू मध्ये पत्रकाराच्या नावाने बातमी प्रसिद्ध केली जाईल.
(२) बातम्यांची सत्यता किंवा त्यापासून होणाऱ्या योग्य अयोग्य परिणामाची पूर्ण जबाबदारी किंवा बातमीचे क्रेडीट स्वतः त्या पत्रकाराचे असेल.
(३) बातमी पाठविताना पत्रकाराने बातमीचा स्त्रोत / सोर्स नमूद करणे गरजेचे आहे.
(४) स्त्रोत/सोर्स म्हणजे बातमी कशी मिळाली. बातमी स्वतः घटनास्थळी किंवा कार्यक्रमस्थळी जाऊन घेतली आहे. प्रसिद्धीपत्रकावरून घेतली आहे. संबधित लोकांकडून घेतली आहे. (व्यक्तीचे नाव), वेबसाईट किंवा लिंकवरून घेतली आहे. इतर वृत्तपत्रामधून घेतलेली आहे. किंवा अन्य कोणत्या मार्गे घेतली आहे. बातमी कोठून व कशी मिळवलेली आहे हे संपादकांना समजले तरच बातमी प्रसिद्ध करण्यास प्राधान्य राहील.
(५) पत्रकाराने पाठविलेली प्रत्येक बातमी प्रसिद्ध होईलच असे नाही. योग्य बातम्यांना प्रसिद्धी दिली जाईल.
(६) बातम्यांना प्रसिद्धी देण्याचा वा नाकारण्याचा पूर्ण अधिकार संपादकाचा राहील.
(७) बातमी पाठविताना balkadu2016@gmail.com या  इमेल वर पाठवावी. अपवादात्मक परिस्थितीत whatsapp वरील बातमी घेतली जाईल.
(८) बातमी पाठविताना बातमी टाईप करून पाठवावी. अपवादात्मक परिस्थितीत हाताने लिहिलेली बातमी घेतली जाईल.
(९) दरमहा कमीतकमी पाच बातम्या प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. 

कागदपत्र
(१) पत्रकाराने स्वतःचे खालील कागदपत्र समक्ष भेटून किंवा पोस्टाने संपादक विभागाकडे पाठवून देणे गरजेचे आहे.
१) आधारकार्ड झेरॉक्स 
२) मतदानकार्ड झेरॉक्स 
३) रेशनकार्ड झेरॉक्स 
४) राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुकची झेरॉक्स
५) विनंती अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात 
६) संमती पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात 
७) शिफारस पत्र – (पत्रकाराला ओळखणाऱ्या एका मान्यवराचे लेटर पँँडवर)  
८) पासपोर्ट साईज फोटो – ३ 
(२) कागदपत्रके पोस्टाने पाठविण्या अगोदर संस्थापक/संपादक बाळकडू यांच्याशी चर्चा करावी. त्यानंतरच पाठवावे.
(३) पत्रव्यवहाराचा पत्ता :- श्री.दिपक पोपट खरात, संपादक दैनिक बाळकडू, मु.पो.कुरवली ता.इंदापूर जिल्हा पुणे पिन- ४१३१०४

कामाचे स्वरूप / नियमावली 
(१) दररोज सकाळी ७ वाजता संस्थापक/संपादक काही सूचना, निवेदन, कामाचे ध्येय पत्रकार ग्रुप वर जाहीर करतील. त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात यावा.
(२) पत्रकाराचे काम समाधानकारक नसेल तर काम थांबविण्यात येईल किंवा पद अवनती करण्यात येईल.
(३) पत्रकाराचे काम वरिष्ठ प्रतिनिधी पेक्षा उत्कृष्ट असेल तर पत्रकारास बढती देण्यात येईल. पदोन्नती केली जाईल.
(४) पदोन्नती दरवर्षी ऑगस्ट  महिन्यात करण्यात येईल.
(५) पदोन्नती किंवा पद अवनती झाल्यावर किंवा नियुक्ती रद्द झाल्यावर अगोदर दिलेले ओळखपत्र व नियुक्तीपत्र रद्द होईल. 
(६) संपादक – जिल्हा प्रतिनिधी – विधानसभा प्रतिनिधी – वार्ताहर / पत्रकार अशी पदांची मांडणी असेल.
(७) दैनिक बाळकडू ची वेबसाईट www.balkadu.com या वेबसाईट वर पत्रकाराचे नियुक्तीपत्र / ओळखपत्र दिसत असेल तरच पत्रकार अधिकृत समजावा.
(८) दैनिक बाळकडू ओळखपत्र व नियुक्ती पत्राचा उपयोग पत्रकारांनी योग्य ठिकाणीच करावा.
(९) ओळखपत्र, नियुक्तीपत्राचा दुरुपयोग केल्यास किंवा बाळकडू पत्रकार असल्याचे सांगून काही चुकीचे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पत्रकार नियुक्ती रद्द करण्यात येईल.
(१०) दैनिक बाळकडू वृत्तपत्र संस्थापक/संपादक यांच्या कामकाजाच्या सूचना न पाळल्यास पत्रकार नियुक्ती रद्द करण्यात येईल.
(११) सलग तीन महिने एखादा पत्रकार काम योग्यरीत्या करीत नसेल तर त्याची पत्रकार नियुक्ती रद्द करण्यात येईल.
(१२) बाळकडू पत्रकारास इतर वृत्तपत्रात काम करण्यास परवानगी राहील. काहीही हरकत असणार नाही.
(१३) दैनिक बाळकडू विषयी कामाचे स्वरूप किंवा नियमावली मध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार संस्थापक / संपादक व मालक दैनिक बाळकडू यांना राहतील.

दैनिक बाळकडू छापील पेपर सभासद 
दैनिक बाळकडू छापील पेपर ची वार्षिक वर्गणी एक हजार रुपये आहे. वार्षिक वर्गणीदार सभासदांना सभासद झाल्यानंतर एक वर्षासाठी घरपोच बाळकडू पेपर पाठविण्यात येईल.

दैनिक बाळकडू डिजिटल पेपर सभासद
दैनिक बाळकडू डिजिटल पेपर ची वार्षिक वर्गणी शंभर रुपये आहे. वार्षिक वर्गणीदार सभासदांच्या मोबाइल वर किंवा इमेल वर डिजिटल पेपर चे रोजचे अंक पाठविले जातील. स्वतःचा आयडी व पासवर्ड टाकल्यावर डिजिटल पेपर ओपन होईल. सभासदांना एक वर्षासाठी  डिजिटल पेपर पाठविण्यात येईल.

संपर्क व अधिक माहिती साठी.

आपला विश्वासू :- श्री.दिपक खरात. 
संस्थापक / संपादक “बाळकडू” वृत्तपत्र 
मोबा. 9623304007  /  7057104007 

=================================