बाळकडू पत्रकारांसाठी नियमावली व कामाची पद्धत

नियमावली / कामाची पद्धत 

राज्य दैनिक ” बाळकडू “
|| हिंदुत्वाचा मानबिंदू ||

|| आवाज महाराष्ट्राचा ||

(१.१) [ निवेदन :- ‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे’ यांच्या विचारांच्या प्रेरणेतून ‘बाळकडू’ हे वृत्तपत्र सुरु केलेले आहे. मात्र बाळकडू हे वृत्तपत्र कोणत्याही राजकीय पक्षाशी संबधित नाही. बाळकडू हे हिंदुत्ववादी विचारांचे, मराठी भाषेतील पूर्णपणे स्वतंत्र, नि:पक्ष व सर्वसमावेशक वृत्तपत्र आहे. ]

(१.२) “बाळकडू” वृत्तपत्र शुक्रवार दि.०८ एप्रिल २०१६ रोजी गुढीपाडवा या दिवसापासून सुरु केलेले आहे.  महाराष्ट्र राज्यात विस्तारत असलेल्या राज्य दैनिक बाळकडू वृत्तपत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून पत्रकार नियुक्ती केली जात आहे.
दैनिक बाळकडू वृत्तपत्राच्या माध्यमातून स्वतःची पत्रकार म्हणून नवी ओळख निर्माण करण्याची हि सुवर्णसंधी आहे. इच्छूक पत्रकारांनी संपर्क करावा. संपर्क क्रमांक ९६२३३०४००७ / ७०५७१०४००७

(१.३) पत्रकार कसा पाहिजे 
मित्रांनो ….
मला माझ्या पत्रकार टीम मध्ये टाईमपास करणारी, आळशी, कामचोर, लबाड, ढोंगी आणि विश्वासघातकी माणसे नको आहेत. समर्पित असणारी, एकाग्रचित्त असणारी, महत्वाकांक्षा बाळगणारी, संकल्पवान आणि ज्यांना चांगला, उत्तम पत्रकार होण्याची इच्छा आहे अशी माणसे मला माझ्या पत्रकार टीम मध्ये हवी आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या गोष्टींना पुढे आणणारी माणसे हवी आहेत. आपण राज्य दैनिक बाळकडू साठी पत्रकार होण्यास इच्छुक असाल तर आपले मनापासून स्वागत आहे. लवकरात लवकर बाळकडू पत्रकार टीम मध्ये सामील व्हावे. आपले भविष्य नक्कीच उज्वल आहे.
…. संपादक दिपक खरात 

(२) बाळकडू पत्रकारांना मिळणाऱ्या गोष्टी खालील प्रमाणे…  
(२.१) ओळखपत्र / आयकार्ड – १ वर्षासाठी 
(२.२) ‘महाराष्ट्र देशा’ – पुस्तक भेट (उत्कृष्ट काम असणाऱ्यांना फक्त)

(३) दैनिक बाळकडू साठी पत्रकार होण्याची पात्रता
(३.१) पत्रकार होण्याची इच्छा व आवड असावी.
(३.२) शिक्षण किमान १२ वी उत्तीर्ण असावे.
(३.३) वय १८ वर्षे पूर्ण असावे.
(३.४) सोशल मिडिया चा वापर करता येत असावा. (फेसबुक, व्हॉट्सअँप, इमेल, इतर, इत्यादी)
(३.५) अंगी प्रामाणिकपणा असावा.
(३.६) बाळकडू संस्थापक / संपादकाच्या सूचनेनुसार काम करण्याची तयारी असावी. 

(४) दैनिक “बाळकडू” पत्रकार होण्यासाठी काय करावे
(४.१) सर्वप्रथम बाळकडू छापील पेपर चे वार्षिक वर्गणीदार सभासद व्हावे लागेल. 
(४.२) बाळकडू छापील पेपर ची वार्षिक वर्गणी, सभासद फी १०००/- रुपये व प्रोसेस फी २००/- रुपये असे एकूण १२००/- रुपये प्रथम भरावे लागतील.
(४.३) सदर बाराशे रुपये (१२००/-रु.) हि रक्कम विनापरतावा (नॉन रिफंडेबल) स्वरुपात घेतली जात असल्याने पैसे परत मिळणार नाहीत.
(४.४) सदर १२००/- रुपये दैनिक बाळकडू अधिकृत बँक खात्यावर पाठवावेत. किंवा अँप वरून पाठवावेत. कोणाकडे परस्पर देवू नयेत.
(४.५) फोन पे, गुगल पे, पेटीयम या अँप वरून पैसे पाठविण्यासाठी 9623304007 हा नंबर आहे. अँप वरून पैसे पाठविताना पत्रकाराने स्वतःचे नाव लिहिणे गरजेचे आहे.
(४.६) पैसे पाठविल्यावर संपादक बाळकडू यांना प्रथम पैसे पाठविल्याचा स्क्रीन शॉट पाठवावा. त्यानंतर फोन करून किंवा व्हॉट्सअप वरून पैसे पोहचले कि नाही याची खातरजमा करून घेणे.

(५) अधिकृत पत्रकार कोणाला समजावे 
(५.१) वार्षिक वर्गणी, प्रोसेस फी आणि कागदपत्र दिल्यानंतर पत्रकारास बाळकडू जिल्हा ग्रुप मध्ये घेण्यात येईल.
(५.२) शालेय शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, कामाचा अनुभव, मुलाखत, बाळकडू साठी प्रामाणिकपणे दिलेले योगदान या बाबींचा विचार करून नियुक्ती घोषित करण्यात येतील.
(५.३) एक ते दोन महिने पत्रकाराचे काम पाहिल्या नंतर बाळकडू वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध करून अधिकृत पत्रकार म्हणून नियुक्ती घोषित करण्यात येईल.
(५.४) नियुक्ती घोषित झालेल्या अधिकृत पत्रकारांना १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतचे एक वर्षासाठी ओळखपत्र (आयकार्ड) देण्यात येईल. 
(५.५) चांगले काम करणारे पत्रकार १ वर्षानंतर पुढे कंटीन्यू केले जातील. त्यावेळी त्यांना पुन्हा प्रोसेस फी भरावी लागणार नाही. 
(५.६) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकृत पत्रकारास “महाराष्ट्र देशा” पुस्तक देण्यात येईल. (सरसकट सर्वांना दिले जाणार नाही.)
(५.७) अधिकृत पत्रकार नावे व त्यांची माहिती  www.balkadu.com या वेबसाईट वर पाहायला मिळेल.
(५.८) ज्यांची अधिकृत पत्रकार म्हणून नियुक्ती घोषित केली जाणार नाही. त्यांना पत्रकार ओळखपत्र दिले जाणार नाही. मात्र त्यांनी छापील पेपर ची वार्षिक वर्गणी भरली असल्याने पोस्टाने बाळकडू पेपर चे अंक पाठविण्यात येतील.
(५.९) कोरोना महामारी संकटामुळे पेपर स्टॉल वरती पेपर पाठविण्यासाठी यंत्रणा उभारणे सध्या शक्य नसल्याने पोस्ट पार्सलने १५ दिवस किंवा १ महिन्याचे एकत्रित अंक पाठविण्यात येतील.

(६) बातमी नियमावली
(६.१) बाळकडू मध्ये पत्रकाराच्या नावाने व मोबाईल नंबरसह बातमी प्रसिद्ध केली जाईल.
(६.२) बातम्यांची सत्यता किंवा त्यापासून होणाऱ्या योग्य, अयोग्य परिणामाची पूर्ण जबाबदारी किंवा बातमीचे क्रेडीट स्वतः त्या पत्रकाराचे असेल.
(६.३) बातमी पाठविताना पत्रकाराने बातमीचा स्त्रोत (सोर्स) नमूद करणे गरजेचे आहे.
(६.४) स्त्रोत (सोर्स) म्हणजे बातमी कशी मिळाली, कुठून मिळाली, कोणी दिली. बातमी स्वतः घटनास्थळी किंवा कार्यक्रमस्थळी जाऊन घेतली आहे. प्रसिद्धीपत्रकावरून घेतली आहे. संबधित लोकांकडून घेतली आहे. (बातमी देणाऱ्या व्यक्तीचे नाव), वेबसाईट किंवा लिंकवरून घेतली आहे. इतर वृत्तपत्रामधून घेतलेली आहे. किंवा अन्य कोणत्या मार्गे घेतली आहे. बातमी कोठून व कशी मिळवलेली आहे हे संपादकांना समजले तरच बातमी प्रसिद्ध करण्यास प्राधान्य राहील.
(६.५) पत्रकाराने पाठविलेली प्रत्येक बातमी प्रसिद्ध होईलच असे नाही. 
(६.६) बातम्यांना प्रसिद्धी देण्याचा वा नाकारण्याचा पूर्ण अधिकार संपादकाचा राहील. 
(६.७) बातमी प्रसिद्ध न होण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण दिले जाणार नाही. 
(६.८) प्रकाशित / प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची पत्रकार कार्यदर्शिकेत नोंद ठेवली जाईल.
(६.९) बातमी पाठविताना balkadu2016@gmail.com या इमेल वर पाठवावी. अपवादात्मक परिस्थितीत व्हॉटस्अप वरील बातमी घेतली जाईल.
(६.१०) बातमी पाठविताना बातमी टाईप करून पाठवावी. अपवादात्मक परिस्थितीत हाताने लिहिलेली बातमी घेतली जाईल.
(६.११) दरमहा कमीतकमी तीन बातम्या प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. 
(६.१२) पत्रकाराने स्वतःच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची नोंद ठेवणे व बातमीचे कात्रण काढणे किंवा बातमी क्रॉप करून ठेवणे आवश्यक आहे. तसेच महिना पूर्ण झाल्यानंतर त्या महिन्यात किती तारखेला किती बातम्या प्रसिद्ध झाल्या याची माहिती व क्रॉप केलेल्या बातम्या कार्यदर्शिका नोंदीसाठी संपादकांना पाठविणे आवश्यक आहे. दरमहा ५ तारखेपर्यंत हि माहिती पत्रकारांनी देणे बंधनकारक आहे.

(७) जाहिरात नियमावली 
(७.१) बाळकडू पत्रकार हे ‘अधिकृत जाहिरात एजंट’ सुद्धा असतील.
(७.२) पत्रकारास जाहिरात कमिशन पंचवीस टक्के (२५%) + बोनस दहा टक्के (१०%) म्हणजे एकूण ३५% इतके कमिशन राहील.
(७.३) एका महिन्यात १० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची जाहिरात दिल्यास बोनस १०% रक्कम जाहिरात कमिशन मध्ये वाढवून दिली जाईल. १० हजार पेक्षा कमी जाहिरात असेल तर फक्त २५ % कमिशन मिळेल. १०% बोनस रक्कम मिळणार नाही. 
(७.४) जाहिरात कमिशन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला दिले जाईल.
(७.५) दरमहा कमीत कमी पाचशे (५००/-) रुपयांची जाहिरात मिळवून देणे आवश्यक आहे. 
(७.६) जास्तीत जास्त कितीही रकमेची जाहिरात मिळवू शकता, त्यास बंधन नाही. तसेच जाहिरातीला कार्यक्षेत्राचे बंधन नाही. पूर्ण महाराष्ट्रातून, भारतातून कुठूनही जाहिरात घेवू शकता.
(७.७) जाहिरात दिल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला पाहिजे.
(७.८) जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी किमान दोन दिवस अगोदर जाहिरातीचे पैसे जमा केले पाहिजेत.
उदा. ३ तारखेच्या अंकात जाहिरात लावायची असेल तर त्याआधी १ तारखेपर्यंत जाहिरातीचे पैसे जमा केले पाहिजेत. 
उदा. बुधवार च्या अंकात जाहिरात लावायची असेल तर त्याआधी सोमवारपर्यंत जाहिरातीचे पैसे जमा केले पाहिजेत. 
(७.९) आदल्या दिवशी / एक दिवस अगोदर / शेवटच्या क्षणी / अगदी घाई गडबडीमध्ये येणाऱ्या जाहिराती घेतल्या जातील मात्र त्याचे जाहिरात कमिशन दिले जाणार नाही. 
(७.१०) जाहिरात पाठविताना इमेल वर पाठवावी. अपवादात्मक परिस्थितीत व्हॉटस्अप वरील जाहिरात घेतली जाईल.

(८) कागदपत्र
पत्रकाराने स्वतःची खालील कागदपत्रे प्रत्यक्ष स्वरुपात संपादक विभागाकडे पाठवून देणे गरजेचे आहे.
कागदपत्र क्रमांक १ ते ५ चे सर्व मूळ प्रतीत (ओरीजनल) पाठवावे.
(८.१) विनंती अर्ज – (स्वतःच्या हस्ताक्षरात असावे)  
(८.२) वैयक्तिक माहिती – बायोडाटा (स्वतःच्या हस्ताक्षरात असावे) 
(८.३) शपथपत्र – (स्वतःच्या हस्ताक्षरात असावे)  
(८.४) बातमीच्या जबाबदारीचे स्वलिखित प्रमाणपत्र – (स्वतःच्या हस्ताक्षरात असावे)  
(८.५) शिफारस पत्र – (पत्रकाराला ओळखणाऱ्या एका मान्यवराचे लेटर पँँडवर) 
कागदपत्र क्रमांक ६ ते १५ चे सर्व झेरॉक्स पाठवावे. सर्व झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड असावी. म्हणजे पत्रकाराने झेरोक्स वर स्वतःची सही केलेली असावी.
(८.६) आधारकार्ड (झेरॉक्स) 
(८.७) मतदानकार्ड (झेरॉक्स) 
(८.८) पॅनकार्ड (झेरॉक्स)
(८.९) रेशनकार्ड (झेरॉक्स)
(८.१०) राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (झेरॉक्स)
(८.११) शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स)
(८.१२) शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक इ.१०वी (झेरॉक्स)
(८.१३) शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक इ.१२वी (झेरॉक्स)
(८.१४) शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक – उच्च शिक्षण, इतर शिक्षण (झेरॉक्स)
(८.१५) पत्रकारितेशी संबंधित शिक्षण किंवा कोर्स झाला असेल तर त्याचे प्रमाणपत्र (झेरॉक्स)

(९) कामाचे स्वरूप / नियमावली 
(९.१) (दररोज किंवा अधून मधून) सकाळी ८ वाजता संस्थापक / संपादक काही सूचना, निवेदन, कामाचे ध्येय ‘पत्रकारांच्या व्हॉट्सअप ग्रुप’ वर जाहीर करतील. त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात यावा. (प्रतिसाद १२ तासांच्या आत येणे अपेक्षित आहे. त्यानंतर चा प्रतिसाद उशिरा समजला जाईल.)
(९.२) पत्रकाराने दिलेला प्रतिसाद पत्रकार कार्यदर्शिकेत नोंद करण्यात येईल. किती वेळात प्रतिसाद दिला त्याच्यावरून पत्रकाराच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येईल. प्रतिसाद नोंद पुढीलप्रमाणे असेल.
सकाळी ८ ते सकाळी ११ :- अतितात्काळ (१) 
सकाळी ११ ते दुपारी २ :- तात्काळ (२)
दुपारी २ ते दुपारी ५ :- संथ (३)
दुपारी ५ ते संध्याकाळी ८ :- अतिसंथ (४)
संध्याकाळी ८ ते रात्री ११ :- विलंबित / उशिराने (५)
प्रतिसाद न देणारे :- बेजबाबदार (६) 
(९.३) पत्रकाराचे काम समाधानकारक नसेल तर काम थांबविण्यात येईल. नियुक्ती रद्द करण्यात येईल. 
(९.४) दरवर्षी पत्रकारांची जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये नव्याने नियुक्ती केली जाईल. त्यामुळे ३१/१२/२०२१ रोजी सध्याच्या नियुक्त्यांचा कार्यकाळ आपोआप संपुष्टात येईल.
(९.५) दरवर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये बाळकडू व्यवस्थापनाच्या सोयीच्या वेळेनुसार नवीन आयकार्ड देण्यात येईल. 
(९.६) दैनिक बाळकडू ची वेबसाईट www.balkadu.com या वेबसाईट वर पत्रकाराचे आयकार्ड किंवा नाव दिसत असेल तरच पत्रकार अधिकृत समजावा. अन्यथा नाही.
(९.७) दैनिक बाळकडू ओळखपत्राचा (आयकार्डचा) उपयोग पत्रकारांनी योग्य ठिकाणीच करावा.
(९.८) टोलनाके, किंवा इतर अस्थापना असलेल्या ठिकाणी आर्थिक सवलतीसाठी ओळखपत्राचा गैरवापर करू नये.
(९.९) कोणावरही दबाव निर्माण करण्यासाठी ओळखपत्राचा गैरवापर करू नये. आर्थिक वसुली, हप्ते, खंडणी, आर्थिक तडजोडी याप्रकारची कृत्ये करू नयेत.
(९.१०) ओळखपत्र, नियुक्तीपत्राचा दुरुपयोग केल्यास किंवा बाळकडू पत्रकार असल्याचे सांगून काही चुकीचे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पत्रकार नियुक्ती रद्द करण्यात येईल.
(९.११) दैनिक बाळकडू वृत्तपत्र संस्थापक / संपादक यांच्या कामकाजाच्या सूचना न पाळल्यास पत्रकार नियुक्ती रद्द करण्यात येईल.
(९.१२) दैनिक बाळकडू सोबत अप्रामाणिक राहिल्यास, विरोधी कृत्य केल्यास, किंवा विरोधी वागणाऱ्यांना साथ दिल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल. 
(९.१३) बाळकडू पत्रकार ग्रुप मधील कामकाजाचे मेसेज, कामकाजाची माहिती, नियोजने, ऑफिस वर्क संपादकांच्या परवानगी शिवाय ग्रुप बाहेर इतरांना पाठविल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल.
(९.१४) डिजिटल पेपर वाचक चे कमीत कमी ५० पंचवार्षिक सभासद ३१/१२/२०२१ पर्यंत मिळवून देणे आवश्यक राहील.  (२५ एप्रिल २०२१ पर्यंत ५० डिजिटल सभासद केल्यास “महाराष्ट्र देशा” पुस्तक भेट दिले जाईल.) डिजिटल सभासद करण्यासाठी कार्यक्षेत्राचे बंधन नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही भागातून तुम्ही डिजिटल वाचक सभासद करू शकता.
(९.१५) सलग दोन महिने जो पत्रकार काम योग्यरीत्या करीत नसेल तर त्याची पत्रकार नियुक्ती रद्द करण्यात येईल.
(९.१६) बाळकडू पत्रकारास इतर वृत्तपत्रात काम करण्यास परवानगी राहील. काहीही हरकत असणार नाही. मात्र त्यामुळे बाळकडू ला काही त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घ्यावी.
(९.१७) बाळकडू मध्ये बातमी साठी पैसे घेतले जात नाहीत. पेड न्यूज घेतली जात नाही. बातमी मोफत प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे कोणी पत्रकार बातम्यांसाठी पैसे घेताना निदर्शनास आल्यास नियुक्ती रद्द केली जाईल.
(९.१८) ज्या पत्रकारांची बाळकडू मधील नियुक्ती रद्द करण्यात येईल. त्यांना बाळकडू पेपर अंक मिळणार नाहीत. अंक पाठविले जाणार नाहीत.
(९.१९) दैनिक बाळकडू विषयी कामाचे स्वरूप किंवा नियमावली मध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार संस्थापक / संपादक व मालक दैनिक बाळकडू यांना राहतील. व पत्रकारांसाठी ते बंधनकारक असतील.

(१०) छापील (प्रिंट) पेपर सभासद 
दैनिक बाळकडू छापील (प्रिंट) पेपर ची वार्षिक वर्गणी एक हजार (१०००/-) रुपये आहे. वार्षिक वर्गणीदार सभासदांना सभासद झाल्यानंतर एक वर्षासाठी पोस्टाने पेपर पाठविण्यात येईल. किंवा उपलब्ध असेल तर नजीकच्या वृत्तपत्र विक्रेत्या कडून देण्याची व्यवस्था केली जाईल. पेपर पाठविण्याचे नियोजन वितरण विभागाकडून केले जाईल. सदर पेपर १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधी साठी पाठविण्यात येईल. 

(११) ५ वर्षासाठी डिजिटल पेपर वाचक सभासद
दैनिक बाळकडू डिजिटल पेपर ची पाच वर्षासाठी पंचवार्षिक वर्गणी शंभर (१००/-) रुपये आहे. सदर डिजिटल पेपर सभासद कालावधी १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राहील. डिजिटल पेपर सभासदांना बाळकडू चे विधानसभा व्हॉट्सअप ग्रुप चे सदस्य केले जाईल. विधानसभा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये बाळकडू पेपर pdf नियमित स्वरुपात पाठविण्यात येईल. तसेच बाळकडू चा मोबाईल अँप विनामुल्य देण्यात येईल. सभासद विधानसभा ग्रुप मधून बाहेर पडल्यास किंवा व्हॉट्सअप नंबर बदलल्यास अशा कारणे बाळकडू अंक सभासदाला न मिळाल्यास त्यास सभासद जबाबदार असेल.

(१२) पत्रकार कार्यदर्शिका  
पत्रकाराच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी पत्रकार कार्यदर्शिका महत्वाची आहे. या कार्यदर्शिके मध्ये पत्रकाराच्या सकारात्मक, नकारात्मक सर्व कामकाजाच्या नोंदी ठेवल्या जातील. या नोंदीच्या आधारे चांगले काम असल्यास पत्रकारास पुढील वर्षासाठी पुन्हा नियुक्त करण्यात येईल. किंवा चांगले काम नसल्यास पुढील नियुक्ती रद्द केली जाईल. याचे निर्णय घेतले जातील.

(१३) वेबसाईट 
www.balkadu.com हि अधिकृत वेबसाईट आहे. 

(१४) मोबाईल अँप
balkadu हा अधिकृत मोबाईल अँप आहे. 

(१५) न्यायालयीन बाबी 
न्यायालयीन बाबी बारामती (जि.पुणे) न्यायालयाच्या कार्यकक्षेच्या अधीन राहतील. 

(१६) पत्रव्यवहाराचा पत्ता :-
श्री.दिपक पोपट खरात,
संपादक दैनिक बाळकडू,
मु.पो.कुरवली ता.इंदापूर
जिल्हा पुणे, महाराष्ट्र
पिन- ४१३१०४

संपर्क क्रमांक 
९६२३३०४००७ व ७०५७१०४००७

=================================

नमुना पत्रे …..

१) विनंती अर्ज (स्वतःच्या हस्ताक्षरात असावा.)

२) वैयक्तिक माहिती / बायोडाटा (स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा टाईप केलेला असावा.)

३) शपथपत्र  (स्वतःच्या हस्ताक्षरात असावे.)

मी श्री………………….. प्रतिज्ञापूर्वक शपथपत्र लिहून देतो की, मी राज्य दैनिक बाळकडू शी प्रामाणिक राहून पत्रकारिता करेन. मी नेहमी बाळकडू चे हिताची गोष्ट करेन. बाळकडू पत्रकार ग्रुप, जिल्हा ग्रुप या वरील मेसेज, कामकाजाची माहिती, महत्वाचा तपशील संपादकांच्या परवानगीशिवाय बाहेर कुठेही प्रसारित करणार नाही. शेअर किंवा फॉरवर्ड करणार नाही. तसेच बाळकडू विरोधी ग्रुप मध्ये सामील होणार नाही. असे शपथपत्र लिहून देत आहे.

नाव व स्वाक्षरी

४) बातमीच्या जबाबदारीचे स्वलिखित प्रमाणपत्र (स्वतःच्या हस्ताक्षरात असावे.)

मी.श्री……………………. सत्य प्रतिज्ञेवर असे लिहून देतो की, मी राज्य दैनिक बाळकडू साठी पाठवीत असलेल्या बातम्यांची पूर्ण सत्यता पडताळून स्वतः बातमी तयार करून पाठवीत आहे.

सदरहू मी पाठविलेल्या बातम्यांमुळे काही अनुचित प्रतिक्रिया उमटल्या तर त्या सर्वांची जबाबदारी पत्रकार म्हणून माझी राहील. मी पाठविलेल्या बातम्यांची जबाबदारी माझी राहील.

नाव व स्वाक्षरी

५) शिफारस पत्र (कोणाही राजकीय, सामाजिक, शासकीय व्यक्तीच्या लेटरपॅड वर असावे. हाताने लिहिलेले किंवा टाईप केलेले असावे.)

========================================================