धाराशिव साखर कारखाना बाॅयलर अग्निप्रदिपन संपन्न

धाराशिव साखर कारखाना बाॅयलर अग्निप्रदिपन संपन्न
बाळकडू : विकास सरवळे
मोबा.९५१८७८१३१०
२५२ पंढरपूर (सोलापूर) :-

धाराशिव साखर कारखाना युनिट १ लि.चोराखळी उस्मानाबाद सन २०२०-२१चा “९वा बाॅयलर अग्निप्रदिपन” शुभारंभ चोराखळीचे मा. सरपंच, कारखान्याचे सभासद खंडेराव मैदांड यांच्या सुविद्य पत्नी सौ.अरूणाताई मैदांड यांच्या हस्ते होम हवन पुजा करून संपन्न झाला.
या शुभप्रसंगी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, व्हाईस चेअरमन विश्वासआप्पा शिंदे, मनसेचे सहकार सेनेचे शाॅडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे, अनंत आखाडे दाजी, डाॅ.जोगदंड, मनसेचे शशिकांत पाटील, सोमनाथ राऊत, रविराजे देशमुख, अभिजीत हुबे, सरपंच बाबा साठे यावेळी कारखान्याचे संचालक रणजित भोसले, दिपक आदमिले, विकास काळे, रामभाऊ रांखुडे, आदी कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात सोशल डिस्टिंगशन ठेवून कारखान्याची कामे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुर्ण केली. कारखान्याची सगळी कामे अंतिम टप्यात असून गळपासाठी कारखाना सज्ज होऊन चार लाख उच्चांकी गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यात आली. पुढील काळात ज्युस ते इथेनॉल प्रक्रिया लवकरच चालू करणार असून असावणी प्रकल्प हा पुढील काही महिन्यात सुरू होत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्याचे घोषीत केले. कोरोनाच्या काळात शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला असून यंदा पावसाने कृपादृष्टी दाखवल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असून शेतकऱ्याची पिकं, ऊस चांगल्याप्रकारे आली असून त्यामुळे ऊस टनेजमध्ये वाढ आहे. शेतकऱ्यांनी आजपर्यंत कारखानावर ठेवलेल्या विश्वासाला जागत ऊस देऊन सहकार्य करावे. असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.

 

जाहिरात व बातमीसाठी बाळकडू पत्रकारांना अवश्य संपर्क करावा..