नायब तहसीलदार वाघूनुडे यांनी केली पिकांची पाहणी, नुकसानग्रस्त शेतकाऱ्यांसोबत साधला संवाद

नायब तहसीलदार वाघूनुडे यांनी केली पिकांची पाहणी, नुकसानग्रस्त शेतकाऱ्यांसोबत साधला संवाद
बाळकडू : देवानंद नावकिकर
मो.८६०५८७०९४३
गंगाखेड (परभणी)

काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, मानवद तालुक्यातील सावरगाव, सावळी, हातलवाडी येथील  नुकसानग्रस्त शेतकाऱ्यांसोबत संवाद साधत नायब तहसीलदार वाघूनुडे साहेब तसेच स्थानिक तलाठी सेन्हा अंबेकर यांच्यासह, पिकांसोबतच, फुटलेले बांध आणि खरडून गेलेल्या जमिनी हे नुकसान त्यांच्या निदर्शनात आणून देत स्पॉट वर पंचनामे करून घेतले,
आपण एवढ्यावरच थांबणार नसून मा.आमदार सुरेशराव वरपूडकर साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब तसेच कृषिमंत्री यांच्या दरबारी लवकरात लवकर प्रश्न मांडून ओला दुष्काळ जाहीर करावा व विम्या सोबतच शेतकऱ्यांना शासनाकडून पण मदत मिळायला हवी ही मागणी करनार आहोत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यास आपण कटिबद्ध आहोत अशी भावना नायब तहसीलदार वाघूनुडे साहेब व्यक्त केली.

बातमी व जाहिरातीसाठी बाळकडू पत्रकारांशी संपर्क करा.