ज्येष्ठ कलावंत जगदीश जोगदंड यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र  देऊन गौरव

ज्येष्ठ कलावंत जगदीश जोगदंड यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र  देऊन गौरव
बाळकडू : देवानंद नावकिकर
मो.८६०५८७०९४३
गंगाखेड (परभणी)
डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुसुम महोत्सवांतर्गत घेतलेल्या रंगभरण व चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात पूर्णा येथील ज्येष्ठ कलावंत व स्पर्धेचे मुख्य परीक्षक जगदीश जोगदंड यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र  देऊन गौरव करण्यात आला. नांदेड येथील कुसुम नाट्यगृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जोगदंड दाम्पत्याला गौरविण्यात आले. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर, बालाजी  कल्याणकर, श्यामसुंदर शिंदे, माधवराव जवळगावकर, मोहनराव हंबर्डे, रावसाहेब अंतापूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाराणी आंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, हनुमंत पाटील बेटमोगरेकर, किसन सोनटक्के, संतोष पांडागळे, संजय बेळगे, बाळासाहेब पाटील, रामराव नाईक, सुशील बेटमोगरेकर, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, विरेंद्रसिंघ गाडीवाले, प्रकाश कोर खालसा, संतोष कुलकर्णी, संदीप सोनकांबळे आदी उपस्थित होते.

बातमी व जाहिराती साठी बाळकडू पत्रकारांशी संपर्क करा.