वसंत सहकारी साखर कारखाना लवकर सुरू करावा – खासदार हेमंत पाटील

वसंत सहकारी साखर कारखाना लवकर सुरू करावा – खासदार हेमंत पाटील
बाळकडू : लखन लोंढे
मोबा. ८५५१८४१९८४
उमरखेड (यवतमाळ) :- उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणा-या उमरखेड तालुक्यात असलेला बसंत सहकारी साखर कारखाना मागील -बऱ्याच वर्षापासून तो बंद अवस्थेत आहे. यामुळे उमरखेड, महागांव, पुसद, हदगाव, हिमायतनगर, आणि किनवट तालुक्याचा बंदी भाग या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाकारखाना बंद असल्याने दुसया तालुक्यातील साखर कारखान्याची वाट धरावी लागली होती. तसेच या भागात असलेले ऊस उत्पादनाचे क्षेत्रही कमी झाले. होते एकेकाळी आघाडीचा असलेला बसंत सहकारी साखर कारखाना संचालक आणि इतर काही कारणांमुळे बंद करण्यात आला होता. परंतु या भागातील शेतकरी आणि ऊस उत्पादक यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे कारखाना सुरू करावा याबाबतची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन यावरून खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. या भागातील शेतकरी हित लक्षात घेऊन हा कारखाना लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी केली. या भागात थोडयाफार प्रमाणात पिकविला जाणारा ऊस इतर भागातनेण्यास शेतकऱ्यांना बाहतूक खर्चाचा भार सहन करावा लागत आहे. शेतकरी हित लक्षात घेता हा कारखाना लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कारखाना लवकर सुरु झाल्यास उमरखेड, महागांव, पुसद सह सर्वच तालुक्यांना याचा नक्कीच लाभ होणार आहे. असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.