पेनूर शिवारात टेंपो व ओमनी गाडीच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी   

पेनूर शिवारात टेंपो व ओमनी गाडीच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी 
बाळकडू : दादासाहेब गायकवाड
मोबा.९९२२९२२९२४
मोहोळ(सोलापूर)

इतर वाहनांना धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभा केलेल्या टेम्पोला वीट भट्टीचे कामगार घेऊन निघालेल्या ओमनी कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २ मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजता पेनुर शिवारातील माने वस्ती जवळ घडली. विठ्ठल राजू जामदार (वय ४०) रा. कुडकी ता.आळंद असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
         याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील पेनुर शिवारामध्ये माने वस्ती जवळ आयशर टॅम्पो क्र. एम एच.१३ सी यु २००२ च्या चालकाने दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४५ वा. दरम्यान मोहोळ ते पंढरपूर रोडवर इतर वाहनातील लोकांच्या जिवीतास धोका होईल, अश्या परिस्थीत वाहन उभा केल्याने त्यास पाठीमागुन पंढरपुरच्या दिशेने जाणाऱ्या ओमिनी कार क्र एम एच. ०६/ए झेड.२२२८ ने धक्का दिला. यात ओमिनी कार मध्ये क्लिनरच्या बाजुस बसलेला विठ्ल राजु जमादार (वय ४०) रा. कुडकी ता. आळद, जि गुलबर्गा हा गंभीर जखमी होवुन जागीच मयत झाला. तर ओमिनी मधील चालक भरत व्यंकट जाधव (वय.४५) व त्याचे सोबतचे  रोहीत दिलीप खताळ (वय.३०) रा दहिवडी ता.माण, शरणाप्पा भिमाशंकर जमादार (वय.५०) रा. हिथलशिरूर, ता. आळंद, जि.गुलबर्गा (कर्नाटक) असे तिघेजण गंभीर जखमी झाले. सदर अपघाताची खबर रामचंद्र ईरप्पा कोगनुर (वय २१) धंदा, मजुरी रा हिथलशिरूर यांनी दिली असून सदर अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार गायकवाड हे करीत आहेत.