घाटणे गावातील सीना नदीवरील पुलासाठी ६ कोटी ९२ लाख मंजूर; आ.यशवंत माने यांची माहिती

घाटणे गावातील सीना नदीवरील पुलासाठी ६ कोटी ९२ लाख मंजूर; आ.यशवंत माने यांची माहिती
बाळकडू : दादासाहेब गायकवाड
मोबा.९९२२९२२९२४
मोहोळ(सोलापूर)
मोहोळ तालुक्यातील घाटणे गावालगतच्या सीना नदीवरील पुलासाठी राज्य सरकारकडून ६ कोटी ९२ लाख व देखभालीसाठी १३ लाख हुन अधिक निधी मंजूर केला आहे. या पुलामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. या पुलासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीच्या सरकार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडुन मंजूर करून आणला असल्याची माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.
        मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील दोन भागांना जोडणारा घाटणे गावाजवळील सीना नदी वरील हा पूल गेल्या अनेक दिवसांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. यासाठी माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांनी पुढाकार घेऊन मंजुरीसाठी प्रयत्नशील होते. अखेर हा पूल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर करण्यात आला असुन या पुलासाठी ६ कोटी ९२ लाख रु राज्य सरकारने मंजूर केले आहेत. तर देखभालीसाठी १३ लाख हुन अधिकचा निधी मंजूर केला आहे. यामुळे घाटणे परिसरातील जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.
■ मोहोळ तालुक्यात माजी आ. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार यशवंत माने यांनी विकास कामांचा सपाटा लावला आहे. यामध्येच या मंजूर पुलामुळे मोहोळ तालुक्यातील लोकांना खूप फायदा होणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा अनेक गावाचा मार्ग सोपा झाला आहे. माजी आमदार राजन पाटील व विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नामुळे आमचा प्रवास सुखाचा होणार आहे.
– ऋतुराज देशमुख
नूतन सरपंच, घाटणे