खारघर येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

खारघर येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन
बाळकडू: देवयानी कुलकर्णी
मोबा : ७४००३८१४७७
पनवेल (रायगड) :
दिनांक :२८ फेब्रुवारी २१ रोजी खारघर युथ काउंसिल (KYC ) या संस्थेच्या माध्यमातून खारघर येथे भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस या भव्य हॉलीबॉल स्पर्धेत वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या एकूण सोळा गटांनी सहभाग नोंदवला होता. हॉलीबॉल स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या पहिल्या विजेत्या गटाचे नाव आहे घनश्याम भट्ट ब्लॅक पॅंथर (उत्तराखंड) व दुसऱ्या क्रमांकाने विजेत्या ठरलेल्या गटाचे नाव आहे टीम अवेंजर ( कामोठे). सदर कार्यक्रमाच्या स्थळी शिवसेना रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष शिरीष घरत,  पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, म्हाडा चे माजी सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक निलेश बाविस्कर व संजना कदम तसेच शिवसेना उपविभाग प्रमुख व संस्थेचे सदस्य नंदू वारुंगसे, संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर सोरटे, दिलीप मस्के व सचिव संदीप गोरे, खजिनदार दत्तात्रय पाटील, अशोक गोळे,शशी प्रकाश सिंह, सोमय्या रंजन मोहंती (बंटी),  व खारघर यूथ कौन्सिलचे सर्व सदस्य व राजकीय-सामाजिक मान्यवर यांनी उपस्थिती दर्शवून सर्वांना शुभेच्छा दिल्या.