अंबरनाथ येथे युवा सेनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

अंबरनाथ येथे युवा सेनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
बाळकडू : प्रकाश सोनवणे
मोबा.९९८७४७१०३२
अंबरनाथ( ठाणे):-
आज दि. २३ मे २०२१ रोजी अंबरनाथ पूर्व भागातील स्वामी समर्थ चौक येथील कै. शांताराम जाधव सभागृह येथे अंबरनाथ युवासेने तर्फे आयोजित केलेले रक्तदान शिबीर पार पडले.
             आज देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. वेळीच परिस्थितीचे गांभीर्य राखुन शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि युवासेना प्रमुख मा. मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांनी देशातील तरुणांना रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. सध्या देशावर भयानक संकट ओढवले असून अशा परिस्थितीत सर्वांनी आपले सर्वोत्तम योगदान देणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ युवासेनेतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अंबरनाथ मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
मा. मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत
युवासेना सचिव मा. वरूनजी सरदेसाई, सुरजजी चव्हाण व जिल्हाधिकारी दीपेश दादा म्हात्रे सुचनेनुसार आणि शिवसेना शहर प्रमुख मा. श्री. अरविंद वाळेकर यांनी केलेल्या आवाहनवरून आज १०७ नागरिकांनी या ठिकाणी हजेरी लावून रक्तदान केले आणि या समाजकार्यासाठी आपले योगदान दिले.
आयोजनात अंबरनाथ युवासेना शहरअधिकारी स्वप्नील जाविर, उत्तम आयवळे, युवासेना शहर सचिव स्वप्नील भामरे, दुर्गेश चव्हाण, उपशहर अधिकारी गणेश आयवळे, रुपेश देशावरे, अजय गारकर, अभिजीत शिंदे, जय खाडे, शैलेश भोईर, प्रतीक लोटकीकर, गणेश राजवल, नवीन, रोहित सूर्यवंशी, निलेश शिंदे, वैभव आढाव, जेष्ठ शिवसैनिक दाजी बनकर कर, शिवसेना उपशहरप्रमुख पुरुषोत्तम उगले आणि संभाजी कळमकर, उत्तम आयवळे, शिवसेना विभागप्रमुख सचिन गुडेकर, मा.नगर सेवक सुभाष साळुंके, युवतीसेनेच्या हर्षाली इंगळे, सिमरन शेख, समीर मगर,वैभव शितोळे, रफिक आसंगी, पंकज टीकोने, वैभव डावरे, यांच्या सह सर्व युवासेना पदाधिकारी, युवासैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *