मुंबईतील आर्ट प्लाझा कलादालनात झळकणार शहापुरच्या जगदीश पडवळांचे चित्रप्रदर्शन…

(भिवंडी – बाळकडू तालुका प्रतिनिधी कल्पेश कोरडे.)

मुंबई :- “कुंचल्याच्या” किमयेगारेतुन व हातांच्या बोटांचा वापरकरुन रेखाटन केलेल्या चित्रातुन, कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या “शहापुर” तालुक्यातील, ‘मळेगाव’ येथील गणपत भाऊ पडवळ यांची आर्थिक परिस्थीती अत्यंत “बिकट” असल्या कारणे घरातील मुलाबाळांच्या “उच्च शिक्षणाची दारे” सहाजिकच बंद झाली. या बिकट परिस्थीतीला सामोरेजाऊन गणपत पडवळ यांचे नातु जगदीश याने “बारावीपर्यंतचे” आपले “शिक्षण”पुर्ण केले.

जगदीशला लहान वयापासुनच चित्रकलेची अत्यंत आवड असल्याने अंबरनाथ येथील “विद्यालंकार चित्रकला महाविद्यालयात” प्रवेश घेऊन “ए.टी.डी” कोर्सही पूर्ण केला.
  पण यापुढे प्रश्न पडतो तो म्हणजे बिकट परिस्थिती चित्रकलेची आवड जोपासायची कशी…?चित्रकलेसाठी लागणारे साहीत्य आणायचे कसे…?यावर तात्पुरता उपाय म्हणुन आजुबाजुच्या परिसरातील घरांच्या रंगरंगोटीची कामे करून चित्रकलेसाठी लागणारे साहीत्य व कुटुंबवासीयांचा उदनिर्वाह जगदीश यामार्गे करु लागला, व हाच रोजगाराचा मार्ग जगदीशने अवलंबविला तो इथेच न थांबता  तालुक्यातीलच नव्हे तर तालुक्याशेजारील “जिल्हा परिषदेच्या डिजीटल” शाळेत रंगरंगोटीची कामे करुन शालेय भिंतीवर शैक्षणिक विषयक, ” प्रगत महाराष्ट्र” ,’ग्रामीण जिवन’ ,”ज्ञान रचना वाद” , स्वच्छता अशा विविध विषयांचे अप्रतिम चित्रिकरण रेखाटुन “शिक्षणाविषयी” स्वताःची आतुरता-आवड आपल्या या उत्कृष्ट चित्रकलेमार्फत तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण ठाणे जिल्यात स्वताःची व आपल्या कलेची छाप उमटवली.
सदरील रंगरंगोटीची कामे शहापुर, भिवंडी तसेच नवीमुंबईतील अनेक शाळांमध्ये पुर्ण केले.
 आपल्या रेखाटन केलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन रेखाटन केलेल्या चित्रांचे प्रदर्शन तालुक्यातील सावरोली,कृष्णाचीवाडी  या शाळांत आयोजित केलेल्या प्रदर्शनात मांडले व ठिकठिकाणाहुन त्याला व त्याच्या कलेला वाव मिळु लागला शुभेच्छा, आशीर्वादांचा वर्षाव होवु लागला.
जगदीशने प्रामुख्याने – ‘मृगजळ’, ‘आदिवासी नृत्य’, “माझी माय” , ‘ग्रामीण जिवन’, ‘शेतकरी’ , “कृष्णलिला”, गवळण,आदिवाशांचे जिवन चरीत्र,बंधन, “स्रियांचे प्रश्न”, रुढी परंपरा, अध्यात्म, “जशी दृष्टी तशी सृष्टी”. व मा.हिंदूहृदयसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे यांच फक्त हळद-कुंकु व आपल्या हाताच्याबोटां व्यतिरिक्त कोणत्याही साधनाचा उपयोग न करता भव्य अस चित्र जगदीशने साकारलं आहे. अशा अनेक विषयांत सखोल अभ्यास करुन अप्रतिम उत्कृष्ट व सुसंगतीत चित्रांचे भव्य प्रदर्शन मुंबईतील आर्ट प्लाझा कला दालनात ८ ते १३ जानेवारी असे ६ दिवशीय भव्य प्रदर्शन या कलादालनात भरविण्यात येणार आहे.
शहापुर तालुक्यातुन प्रथमता एका आदिवासी चित्रकाराच्या चित्राचे प्रदर्शन मुंबई येथे होत आहे हे आदिवासी समाजाकरिता व शहापुर तालुक्याकरिता अभिमानास्पद बाब आहे.
सदरिल चित्रांच्या प्रदर्शनेकरिति जगदीशवर शुभेच्छांचा व आशीर्वादांचा वर्षांव तालुक्यातुनच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यांतुन होत आहे.
यासोबतच जगदीश हा शहापुर तालुक्यातील सुप्रसिद्ध चित्रकार जगदीशचे “गुरुवर्य” श्री.किरणजी सोनावणे यांचे या चित्रविक्रीतुन आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता प्रयत्नशील आहे. यातुन एक बाब स्पष्टपणे उघड होते की “गुरुच्या गुरुदक्षिणेकरिता” पुन्हाः एकदा प्रथम एक आदिवासी युवक तालुक्यातुन चित्रकारिकतेमध्ये एक नविन उदयास आलेला चेहरा जगदीश पडवळ हा किती प्रयत्नशील आहे हे दिसुन येते.
सदरिल चित्र प्रदर्शन प्रख्यात व जाणकार चित्रकारांच्या उपस्थितीत पार पडणार असुन, चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आपल्या “आई-वडीलांच्या” हस्ते करण्याची एक प्रेमळ अन प्रबळ इच्छा जगदीशने सर्वांसमवेत व्यक्त केली.
अशा या प्रबळ इच्छाशक्ती जोपासनाऱ्या जगदीशला “बाळकडु” तर्फे शिव शुभेच्छा…!