*स्मार्टव्हीलेज समितीकडून करंजगावची पाहणी*

समाधान भाऊसाहेब कोकाटे
प्रतिनिधी निफाड तालुका

*निफाड प्रतिनिधी* .दि.७ : निफाड तालुक्यातील स्मार्टव्हीलेज स्पर्धेत सहभाग घेतलेल्या करंजगाव, सुकेने, विंचुर, हनुमाननगर या गावांची पाहणी व मूल्यमापन येवल्याच्या समितीने आज केले. गतवर्षी निफाड़ तालुक्यात स्मार्टग्रामचे प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या करंजगाव ग्रामपालिकेची पाहणी यावेळी येवल्याचे गटविकास अधिकारी शेख व ग्रामविस्तार अधिकारी अहिरे यांनी आज केली. सरपंच सौ.मनीषा प्रवीण पाटील-राजोळे, उपसरपंच श्रावण गांगुर्डे यांनी समितीचे स्वागत केले. यावेळी निफाड़चे विस्तार अधिकारी के.टी गादड व सोनवणे साहेब उपस्थित होते. यावेळी सर्वांचा सत्कार करण्यात आला. स्मार्टग्राम समितीचे तपासणी अधिकारी शेख यांनी ग्रामपालिकेची दप्तर तपासणी करून समाधान व्यक्त केले. तसेच करंजगाव ग्रामपालिकेच्या सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापण प्रकल्पाची पाहणी केली. समिती सदस्यांना विविध विकासकामांची माहिती यावेळी मा.सरपंच खंडू बोडके-पाटील व ग्रामविकास अधिकारी पी.पी खैरनार यांनी दिली. समिति पाहणी दौऱ्यावेळी पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, ग्रामपालिका सदस्य सौ.अनिता सोमनाथ भगुरे, खंडू बोडके-पाटील, नंदू राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू निर्भवने, सोमनाथ भगुरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.