पत्रकारांच्या सकारत्मक लिखाणातुन वास्तवाचे दर्शन : आमदार अनिल कदम*

समाधान भाऊसाहेब कोकाटे
बाळकडु प्रतिनिधी : निफाड तालुका

*निफाड प्रतिनिधी* दि.९ . निफाड तालुक्यात महाराष्ट्र पत्रकार संघ व कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालय यांच्यातर्फे निफाड माहाविद्यालयाच्या सभाग्रहात पत्रकार दिननिमित आयोजित कार्यक्रमात *शिवसेना आमदार अनिल कदम*बोलत होते की आजच्या गतिमान युगात वास्तववादी पत्रकारिता करणे गरजेचे असून पत्रकारांनी केलेल्या सकारत्मक लिखाणामुळे समाजातील घटकांनी दिशा मिळत राजकीय पुढारी प्रशासन यांनी वेळोवेळी वृतपत्राच्या माध्यमातून लिखाण करुन पत्रकार आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतो व वास्तवाचे दर्शन घडवतो असे प्रतिपादन *शिवसेना आमदार अनिल कदम* यांनी केले व *आमदार अनिल कदम* म्हणाले पत्रकाराने निष्पक्ष भावनेने पत्रकारिता करून समाजाला दिशादर्शक म्हणून काम करावे विकासात्मक प्रलबित कामे याबाबत वृतपत्रात वृतांकन करून योग्य अयोग्य याची जाण करणे आवश्यक आहे व्यासपीठावर पत्रकार जयराम पूरी,माजी आ दिलीप बनकर,जि प सदस्य  अमृता पवार,पं स सभापती पडित आहेर,नगरध्यक्ष मुकूद होळकर,उपविभागीय अधिकारी महेश पाटील,तहसीलदार डॉ विनोद भामरे,पोलीस निरीक्षक रणाजित डेरे,बाजार समितीचे संचालक वैकुंठ पाटील,जि प सदस्य बाळासाहेब क्षीरसागर,आदी उपस्थित होते यावेळी निफाड तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते सूनील कुमावत यांनी सुत्रसंचालन केले तर खंडू बोडके यांनी आभार मानले