रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अनंत गिते यांची ग्वाही

पेण

पेण तालुक्यातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या सहकार्याने सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय अवघड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी दिल्ली येथे आयोजित बैठकीत दिली.

सदर बैठक केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली. या बैठकीला रेल्वे मंत्रालय सदस्य एम. जमशेद, रेल्वे ट्राफिक आणि इंडिकेटर अधिकारी संजय वाजपेयी, मनदीप भाटिया, सामाजिक कार्यकर्ते योगेश म्हात्रे, पत्रकार स्वप्निल पाटील, शिवसेना जिल्हा सल्लागार आणि जि.प.सदस्य किशोर जैन, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, श्रीतेज कदम, प्रसाद देशमुख, संगम म्हात्रे, लकी बोहरा ,राजिपचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील आदी उपस्थित होते.

पेण येथे रेल्वे सुरू होऊन तिन दशके लोटली असतानाही येथील हजारो रेल्वे प्रवाशांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने “मी पेणकर,आम्ही पेणकर” या मथळ्याखाली पेणच्या नागरिकांनी पेण रेल्वे स्थानकात सामाजिक कार्यकर्ते योगेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण केले होते.

पेण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या पाहिजेत आणि पेण ला शटल सेवा सुरू झाली पाहिजे या व इतर मागण्यांवर रेल्वे प्रशासनाने लक्ष न दिल्यास रेल रोको करण्याचा इशारा दिला होता. याची दखल शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांनी घेऊन केंद्रीय अवजड उद्योगात मंत्री अनंत गीते यांच्या दालनात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी पेणकरांच्या मागण्यांवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. यामुळे रेल रोको आंदोलन तुर्त स्थगिती करण्यात आले आहे.