वालचंदनगर पाठशाळा क्र.३ या शाळेतील पालखी सोहळा संपन्न

वालचंदनगर :-

शनिवार दि.२१जुलै रोजी वालचंदनगर पाठशाळा क्रमांक ३ पोस्ट कॉलनी या शाळेने पालखी सोहळा आयोजित केला होता. पोस्ट कॉलनी ते राम मंदिर असा हा सोहळा झाला. यामध्ये शाळेच्या ३५० विध्यार्थ्यानी सहभाग घेतला.

या पालखी सोहळ्याचे उदघाटन  वालचंदनगर कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आनंद नगरकर, राहुल माने, ग्रामपंचायत सदस्य योगेश सावंत यांनी केले. या कार्यक्रमास बहुसंखेने पालक वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका विजया वाघमारे यांनी केले. पालखी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी भाग्यलता पाटमास, वंदना सांगळे, दीपलक्ष्मी शिवगुंडे, मनीषा व्यवहारे, जयश्री निकम, कीर्ती वाघमारे, मीरा गायकवाड, लक्ष्मी झेंडे, हनुमंत पाटील, दिपक खरात, नंदकुमार जाधव, संतोष देवरे, राहुल खरात, प्रशांत निंबाळकर या शिक्षकांनी सहकार्य केले.

पालखी क्षणचित्रे