भद्रावती नागरपरिषद वर भगवा फडकवत शिवसेनेने गढ कायम राखला. #शिवसेनेचे अनिल धानोरकर नागराध्यक्षपदी विजयी

भद्रावती नागरपरिषद वर भगवा फडकवत शिवसेनेने गढ कायम राखला.
#शिवसेनेचे अनिल धानोरकर नागराध्यक्षपदी विजयी
# 27 पैकी 16 जागांवर शिवसेनेचा भगवा
(श्रीहरी सातपुते | चिमूर गडचिरोली लोकसभा प्रतिनिधी)
भद्रावती :- गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या भद्रावती (जि. चंद्रपूर) नगर परिषदेवर पुन्हा शिवसेनेचे अनिलभाऊ धानोरकर निवडून आल्याने भद्रावतीत शिवसेनेची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. त्यामुळे भाजपच्या दिगगज नेत्यांना धक्का बसला आहे कारण सलग पाचव्यांदा नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आले आहे.
भद्रावती येथे नगर परिषद स्थापन झाल्यापासून शिवसेनेचा नगराध्यक्ष राहिला आहे. शिवसेनेचे आमदार बाळूभाऊ (सुरेश) धानोरकर पहिल्यांदा निवडून आले. यानंतर सेनेचे संघटन पुन्हा मजबूत झाले आहे. यावेळी नगराध्यक्षपदासाठी आमदार धानोरकर यांनी आपल्या भावाला उमेदवारी दिली होती. आमदार धानोरकर यांनी केलेल्या विकास कामांच्या भरवशावर अनिल धानोरकर निवडून आल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीत भाजप झेंडा रोवेल, असे बोलले जात होते. भाजपच्या “चाणक्‍यां’नी ऐनवेळी शिवसेनेचे नेते व भद्रावतीचे पहिले नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांना भाजपच्या तंबूत आणले व त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारीही दिली. परंतु ऐनवेळी आलेल्या नामोजवार यांना शिवसेनेचा गड भेदता आला नाही. त्यांचा 8 हजारपेक्षा अधिक मताधिक्‍याने पराभव झाला. एकूण 27 सदस्यांच्या या नगरपालिकेत भाजपचे केवळ तीन सदस्य निवडून आले. कॉंग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षा भारिप-बहुजन महासंघाने चार जागा पटकावून आपले अस्तित्व दाखवून दिले.