महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी संजय हाडे यांची फेरनिवड

बुलढाणा

शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी संजय हाडे यांची फेरनिवड शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी व सरचिटणीस सूर्यकांत तांडेल यांनी केली आहे.

संजय हाडे गेल्या ४ वर्षापासून शिववाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. गेल्या ४ वर्षाच्या काळात त्यांनी अनेक तालुका, गाव पातळीवर वाहतूकदारांना एकत्र करत वाहतूक सेनेच्या शाखा स्थापित केल्या. अनेकवेळा वाहतूक दारांच्या समस्येसाठी विविध आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून दिला. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचेकडे सतत मागणी करुन ऑटोरिक्षा टॅक्सीवाल्यांना दहा वर्षापासून बंद असलेले परवाने पुन्हा मिळवून दिले. या त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी पुन:श्च नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.