पिक नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत तर पालकमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांचा इशारा

“…तर पालकमंत्र्याना रस्त्यावर फिरू देणार नाही”. नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शिवसेनेच्या अभय साळुंकेचा इशारा
लातूर जिल्ह्णा प्रतिनिधी बाळकडू वृत्तपत्र ( सचिन छप्रावळे)
लातूर  दि १४ सप्टेंबर २०१८
महिनाभरापासून जिल्हयात पाऊस नसल्याने सोयाबीन, तूर, ज्वारी, आदी पिके वाळली आहेत, पिकांचे नुकसान झाल्यावर मदत मिळावी, त्यासाठी नुकसानीचे पंचनामे करणे आवश्यक आहेत. त्यासाठी तात्काळ पंचनामे करावेत , अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधीकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. पंचनामे झाले नाहीत तर पालकमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी दिला आहे,
     निवेदनात म्हटले आहे कि, सततचा दुष्काळ सरकारने जाहीर केलेला हमीभाव न मिळणे यामुळे जिल्यातील शेतकरी खचला आहे. त्यातच गतवर्षी पिकांचे नुकसान होऊनही जिल्यातील शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात विमाही मिळाला नाही. शेतकऱ्यांनी उसने अवसान काडून यंदा कर्ज कडून पेरण्या केल्या, विम्याचे हप्ते भरले.
     परंतु, गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात पाऊस नाही. यामुळे सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी हि पिके वाळत आहेत. आता पाऊस पडला तरी ७५ टक्के नुकसान होणार आहे. पंतप्रधान पीक योजनेचा नियमांप्रमाणे व्यक्तिगत विभागवार नुकसान झाले तरी विमा कंपनीकडे तक्रार केल्यास ४८ तासांच्या आत पंचनामे करणे बंधनकारक आहे.
      सरकार स्वार्थासाठी विमा कंपन्या बदलत आहे. कंपनीकडे मनुष्यबळ नाही. या सबबीखाली विमा कंपनी पाहणी व पंचनामे करीत नाही. त्यामुळे पुन्हा गेल्यावर्षी प्रमाणेच शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची श्यक्यता आहे.
      हे निवेदन हीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तक्रार गृहीत धरून विमा कंपनीस तात्काळ गाव अथवा महसूल मंडळनिहाय पाहणी व पंचनाम्याचे आदेश द्यावेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्यास पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पीकविमा कंपनी जवाबदार आहे.
      ८ दिवसात विमा कंपनी व महसूलकडून पंचनामे न झाल्यास शिवसेना पालकमंत्र्याना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.