बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा ओझर येथे संपन्न

बाळकडू | सुरेश नाटे
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा 
ओझर दि.२९  :- उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकाराने कम्युनिटी हाँल, ओझर येथे आयोजीत बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या, नाशिक जिल्ह्यातील १०वी/१२वी उत्तीर्ण/अनउत्तीर्ण सर्व शाखांच्या पदवी/पदवीधारक उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली त्या प्रसंगी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडनवीस साहेब, उधोग मंत्री मा.सुभासषजी देसाई साहेब, मा.गिरीशजी महाजन साहेब, शिवसेना नाशिक खाजदार मा.हेमंतजी गोडसे, निफाड तालुक्याचे आमदार मा.अनिलजी कदम, देवलाली मतदार संघाचे आमदार मा.योगेश घोलप, नगरसेवक मा.प्रदीपजी तिदमे, मा.दीपक दातीर,निफाड शिवसेना प्रमुख  मा.सूधीरजी कराड, निफाड पंचायत समिती सदस्य मा.शिवजी सुरासे, चांदोरी शिवसेना शाखा प्रमुख मा.संदिप गडाख, मा.दत्त गडाख
अदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते…
सुरेश  नाटे
निफाड विधानसभा प्रतिनीधी, जि.नाशिक,
बाळकडू वृत्तपत्र
मो.९०११७४८३८२
……………………………………………………………………………………………………………………………………….

बाळकडू | समीर पठाण
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा.
ओझर दि.२९ :- उद्योग विभाग,महाराष्ट्र शासन आणि सीआयआय च्या करियर सेंटरच्या वतीने तसेच निफाड तालुका शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या पुढाकाराने आयोजित रोजगार मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते व उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई  यांच्या उपस्थितीत ओझर येथे संपन्न झाला.
या रोजगार मेळाव्यात सुमारे ६६ उद्योगांनी आपला सहभाग नोंदविला. नाशिक, धुळे आणि नंदूरबार इत्यादी जिल्ह्यांतून युवक यात सहभागी झाले होते. ऑनलाईन पद्धतीने त्यांनी यासाठी नोंदणी केली होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकेकाळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला रोजगार मिळावा यासाठी संघर्ष केला. तेच काम पुढे नेत आज रोजगार पुरविण्याचे काम राज्य सरकार करते आहे.
या वेळी जिल्हा अधिकारी बी राधाकृष्णन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आ.अनिल कदम, आ.देवयानी फरांदे, आ.राहुल आहेर, नाशिक चे महापौर रंजना भानसी, जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे आदि मान्यवर उपस्थित होते.
समीर पठाण
लासलगाव शहर प्रतिनीधी
बाळकडू वृत्तपत्र
मो.९८२२१७१०८५