आगरी प्रकल्पाग्रस्तांच्या मागण्यानी धरला वेग. बबनदादा पाटलांसह उपस्थितांनी सिडको अध्यक्षांना दिले निवेदन.

बाळकडू | गणेश पवार
बेलापूर दि.१३ :-   आगरी प्रकल्पाग्रस्तांच्या सिडकोने दिलेल्या आश्वासनांनुसार प्रलंबित मागण्यांसाठी आमदार प्रशांत ठाकुर यांना सिडको भवन येथे प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकल्पाग्रस्तांचे प्रलंबित प्रश्नाचे निवेदन पनवेल आगरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा  पाटलांसह उपस्थितांनी दिले. या निवेदनात आगरी प्रक्ल्पाग्रस्तांचे बहुतेक प्रश्नाचे  वाढिव भावाचे पैसे ताबडतोब देण्यात येतील, व सिडको हद्दितिल घरे सर्वे झाल्या शिवाय तोडू नये.व इतरही मागण्या सिडकोने दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर पूर्ण असे निवेदन दिले आहे.
      यावेळी उपस्तीत पनवेल सिडको प्रकल्पाग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, शिरिष घरात .भगवान गायकर, वासुदेव घरत, गोटीराम शेठ तोडेकर, शंकरशेठ ठाकुर , ञिबंक केणी, मुरलीधर म्हात्रे,  गजानन पाटील , चंद्रकांत कडू प्रभाकर गोवारी, रामदास पाटील धर्मांनाथ भोईर, भरत पाटील, सुदाम पाटील , कायदेशीर सल्लागार राजाराम पाटील व इतर प्रक्ल्पाग्रस्त नेते उपस्तीत होते.
     याआगोदर प्रकल्पाग्रस्तांच्या मागण्यांची पहिली सभा,
१५ ऑगस्ट रोजी बबनदादांच्या अध्यक्षतेखाली, आगरी कोळी संघर्ष समितीची प्रकल्पाग्रस्तांची सभा बबनदादांच्या नेत्रुत्वाखाली घेण्यात आली होती.
       गेल्या ४ दशकापासून  प्रकल्पाग्रस्तांचे प्रश्न प्रलंबीत आहेत.आंदोलने करूनही फक्त निराशाच वाट्याला आली आहे.त्यामुळे न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा प्रकल्पाग्रस्तांनी पापडीचा पाडा येथे झालेल्या सभेमध्ये दिला होता. यावेळी उपस्थित इतरही मान्यवरांनी सिडकोच्या बदमाशी आश्वासनाचा पाढा वाचला होता.
     यावेळी बोलताना बबनदादानी  आगरी समाजासाठी अपेक्षित असलेला लढा सर्वांच्या बरोबरीने पुढे नेण्याची शपथ घेतली.सर्व पक्षांना सोबत घेऊन हा लढा आपण लढुयात असे आश्वासन दिले.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव साहेबः यांच्या प्रेरणेने प्रकल्पाग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी या मंदिरात आपण शपथ घेत असल्याचे बबनदादांनी जहीर केले होते. अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आगरी कोळी बांधवांसाठी कार्य करत राहील असा इशारादेखील बबनदादांनी सभेमध्ये त्यावेळी बोलताना दिला होता.
 प्रकल्पाग्रस्तांच्या मागण्या
१)गरजेपोटी बांधलेली घरे नियमित झालीच पाहिजेत.
२)गरजे पोटीची बांधकामे १२.५%भूखंडामधून कमी करू नयेत.
३)१२.५%अशी योजना असताना  प्रत्यक्षात ८.७५% भूखंड देण्यात आले आहेत ते पूर्ण १२.५% दिलेच पाहिजे.
४)विमानतळ बांधताना २२.५% भूखंड देण्यात आले परंतु आपली जमीन सुद्धा सिडकोनेच घेतलेली आहे तरी दुजाभाव का.
५)ज्या ठिकाणी सिडकोचे प्रकल्प तयार झाले आहेत व तयार होणार आहेत त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे.
६)सिडकोमध्ये कामाचे निघणारे ठेके स्थानिकांसाठी राखीव पाहिजेत.
७)तलोजा एमआयडीसीच्या प्रदूषणाचा विचार करून तलोजा व नावडा या ठिकाणी आरोग्य केंद्राची सुविधा दिली पाहिजे
८)आपली जमीन समंपादन करताना आपणास एकरी २० हजार ते २६ हजार एवढा भाव दिला.तिच जमीन सिडको ४० करोड ते ५० करोड रुपये एकरी भाव घेऊन विकत आहे.
गणेश पवार
मावळ लोकसभा प्रतिनिधी
बाळकडू वृत्तपत्र
मोबा. ९६५३२४९११३