पोटच्या मुलाला गमावलेल्या आईसाठी शिवसैनिकांनी घेतली धाव. – वाशी येथील हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल कुप्रताप उघड्यावर. 

 बाळकडू | गणेश पवार
रु. ६,६२,००० इतक्या रकमेच्या बिलासाठी बाळ गमावलेल्या डेंग्यूग्रस्त  महिलेस औषधाशिवाय ३ दिवस अडकवून ठेवले. 
खारघर- सौ. मिनाक्षी शेलार या ३६ वर्षीय गरोदर महिलेस डेंग्युची लागण  झाल्याने २० सप्टेंबर रोजी कळंबोली येथील एम.जी.एम. हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते व पुढे ३ दिवसानंतर त्यांना कामोठे येथील एम.जी.एम. हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. ९ महिन्यांची गरोदर असल्याने पुढे या महिलेसह चांगल्या उपचारासाठी वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
फोर्टिस हॉस्पिटलने महिलेचे पती श्री. प्रवीण शेलार यांना सुरुवातीस १० दिवसांसाठी २,६१,००० इतक्या रकमेचे एस्टीमेट दिले आणि या महिलेचे ३,५०,००० इतके मेडिक्लेम होते. परंतु १२ दिवसानंतर या महिलेस ६,८६,००० इतके बिल देण्यात आले.
पोटच्या मुलाला गमावल्याने यातून सावरण्यापूर्वीच फोर्टिस हॉस्पिटल ने मानसिक त्रास देऊन त्यांच्याकडून ३६,००० वसूल केले व उर्वरित पैशांसाठी तगादा लावला होता.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा हॉस्पिटलला या रुग्णांसाठी विनंती पत्र देखील धाडले.
अखेरीस या रुग्णाकरिता संजय मशिलकर या शिवसैनिकानी रुग्णालयात धाव घेतली. १,७१,००० तपासणींचे, १,४१,००० रक्ताचे, १,०३,००० डॉक्टरच्या व्हिसीटचे या सगळ्याचे जाब व कागदपत्रे याची मागणी केली असता प्रशासन घाबरले.  अखेरीस एकही दमडी ना भरता या महिलेस डीशचार्ज मिळाला आणि भरलेल्या  ३६,०००  हि रक्कम ही  परत मिळाली.
या आंदोलनात डॉ. श्रीकांत पंडित, शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे , शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक श्री. सोमनाथ वास्कर आणि श्री काशिनाथ पवार इ. समाविष्ट  झाले.