नाणारमध्ये उच्चस्तरीय समितीला पाय ठेवू देणार नाही…शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले निवेदन.

बाळकडू। सचिन कदम

रत्नागिरी दि.१५/१०/२०१८ :-

‘नाणार येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला कोकणात तीव्र विरोध असताना सरकारने रिफायनरी प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करु नका. त्यासमितीने इथे येऊन थातूरमातूर अहवाल देऊन प्रकल्पाचीच बाजू समिती मांडणारी समिती म्हणजे सरकारने बुजगावणे आहे. त्यामुळे अशी उच्चस्तरीय सुखथनकर समिती पाठवू नये त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनीच नाणार येथे यावं आणि ग्रामस्थांचा विरोध पाहून तिथेच प्रकल्पावर फुली मारावी’, अशी मागणी शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देताना उच्चस्तरीय समितीला नाणार येथे पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला.

राज्य सरकारने माजी मुख्य सचिव सुखथनकर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती नाणार येथे येऊन प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहे. सरकारने नेमणूक केलेल्या समितीवर प्रकल्पग्रस्तांच्या विश्वास नाही त्यामुळे शिवसेनेने यासमितीला विरोध केला आहे. शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज उच्चस्तरीय समितीचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले. यावेळी शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, जिल्हासंपर्क प्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, जि.प.अध्यक्षा स्वरुपा साळवी, सभापती प्रकाश रसाळ,विभांजली पाटील, अभिजीत तेली, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, प्रमोद पवार, प्रकाश कुवळेकर, नगराध्यक्ष राहूल पंडीत उपस्थित होते.

वेळ आली तर गोळ्या झेलू

जैतापूर अणुउर्जा प्रकल्प रेटण्याचा सरकारने प्रयत्न केला तेव्हा गोळीबार झाला होता. नाणार रिफायनरी रेटण्यासाठी सरकारने गोळीबार केला तर आम्ही लोकप्रतिनिधी गोळ्या झेलू अशी आक्रमक भूमिका विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. पुढे राऊत म्हणाले की, आमची मागणी डावलून उच्चस्तरीय समिती आली तर त्या समितीला रत्नागिरीच्या वेशीवर रोखू तसेच प्रकल्प करण्यासाठी या समितीची गरज काय आहे कारण ७० टक्के असंमतीपत्रके ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना दिले गावात येऊन भेटीचा निमंत्रण दिले असे असताना मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांना भेटण्यासाठी न येता समिती कशाला पाठवता असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.