सोलापूर मधील हद्दवाढ भागातील प्रश्नाचं निवेदन शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना दिले

बाळकडू | साहेबराव परबत

सोलापूर  ता १७-१०-२०१८ :- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज सोलापूर दौऱ्यावर आले असता हद्दवाढसह सोलापुरातील विविध प्रश्नांसंदर्भात त्यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण, परिवहन सभापती तुकाराम नाना मस्के, स्थापत्य समिती सभापती नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे आदी उपस्थित होते.
सोलापूरच्या आरोग्य व पण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देतानाच सोलापूरची विमानसेवा सुरळीत व्हावी व आकसापोटी भाजपसेनेच्या कार्यकत्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी शहरप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण यांनी केली. ना. दीपक केसरकर यांना यासंदर्भात जिल्हा निहाय आढावा घेण्यास सांगणार असल्याचं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी जिल्हास्तर नगरोत्थान मधून सोलापूरच्या हद्दवाढला दिलेल्या १७.४० कोटींबद्दल आभार व्यक्त केले व सुधारित अध्यादेश काढून दुरुस्ती करण्याची आवश्यकता निदर्शनास आणून दिली. निधी मंजूर करताना वर्किंग अॉथेरिटी (काम पूर्ण करुन घेण्याचा अधिकार) सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) दिली असून या निधीमधून महानगरपालिकेने जास्तीतजास्त पाण्याच्या पाईपलाईनची कामे सुचविली आहेत. PWD कडे पाईपलाईनचे काम करणारी यंत्रणा नसल्याने काम पुन्हा रखडू शकते. तेव्हा सुधारित अध्यादेश काढून हे काम करण्याचे अधिकार महानगरपालिकेकडे देण्यात येणं गरजेचं असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले.