शिवसेना ” दसरा मेळावा ” साठी चांदवड(नाशिक) वरुन कार्यकर्ते रवाना 

शिवसेना ” दसरा मेळावा ” साठी चांदवड वरुन कार्यकर्ते रवाना

दिनेश शिंदे , (बाळकडू चांदवड ता.प्रतिनिधी )
शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांच्या  विचारांचे सोने लुटण्यासाठी चांदवड तालुक्यातील शिवसैनिक मुंबई च्या दिशेने रवाना झाले आहेत .
      शिवसेना तालुकाप्रमुख मा. शांताराम ठाकरे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील  व शहरातील शेकडो शिवसैनिक सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत . चांदवड येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉल मध्ये सकाळीच शिवसैनिक जमले होते .
      दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांमध्ये जोश भरनारा एक उत्सव असतो . मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी याच दसरा मेळाव्यातुन शिवसेनेची ताकद सर्व देशाला दाखवुन दिली आहे . याच ठिकाणाहून त्यांनी सामन्य शिवसैनिकांत हत्तीचे बळ निर्माण केले आहे . आज शिवसैनिकांत जो धगधगता अंगार आहे त्यावरची काजळी झटकून टाकण्यासाठी मा. बाळासाहेबांनी दसरा मेळावा दणक्यात सुरु ठेवला होतो .
         त्यांच्या पश्चातही मा. पक्ष प्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना याच मेळव्यातुन पक्षाची भरभराट सुरु ठेवली आहे . आजच्या मेळाव्यात पक्षाचे ध्येये धोरणे यांची चर्चा होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण देशाचेही लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे .
           चांदवड येथुन या मेळाव्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख  मा.शांताराम ठाकरे , संघटक मा. दत्ता शिंदे , शहरप्रमुख मा. संदिप उगले , मा. भुषन मुळाने , समन्वयक सोमनाथ पगार , साहेबराव ठोंबरे , दिपक भोयटे , रोहित ठाकरे आदींसह अनेक कार्यकर्ते रवाना झाले आहेत .