कळवण(नाशिक) येथे शिवसेनेच्या पदाधिकार्यांकडुन श्रीराम मंदिरात महाआरती संपन्न

बाळकडू | ललित आहेर (कळवण ता.प्रतिनिधी)

कळवण(नाशिक) दि.२४/११/२०१८

कळवण शहर व तालुक्याच्या वतीने कळवण येथे श्रीराम मंदिरात महाआरती संपन्न
शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दव ठाकरे साहेब अयोध्या येथे शरयु नदी किनारी सायं ६.०० वा.महाआरती करीत असतांना संपुर्ण महाराष्ट्रात त्याचवेळी श्रीराम  मंदिरात महाआरतीचे आयोजन होते.कळवण शहारातील महाआरतीचे आयोजन व  आयोजक शिवसेना शहर प्रमुख साहेबराव पगार व युवासेना उपशहर प्रमुख सचिन पगार यांनी केले. कळवण येथील गांधी चौकातील श्रीराम मंदिरात महाआरती करतांना ….शिवसेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ,माजी तालुकाप्रमुख प्रकाश आहेर ,ग्राहकसंरक्षण कक्ष तालुकाप्रमुख नाना देवरे ,माजी शहरप्रमुख आण्णा पगार ,उपशहरप्रमुख विनोद मालपुरे ,भाजपा शहराध्यक्ष निंबा पगार,मनसेचे माजी शहराध्यक्ष नितिन पगार तसेच शिवसैनिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.