सोलापुरात ऊसतोड कामगारांच्या, मुलांच्या शिक्षणासाठी सर्वे

बाळकडू | साहेबराव परबत
सोलापूर: २७-११-२०१८
वेळ सायंकाळी ६ ची होती   सिद्धेशवर साखर कारखाना च्या बाजूला ऊसतोड कामगारांची वस्ती बसली आहे. ह्या वस्तीमध्ये जवळपास १००,१२५कुटूंब आली आहेत मराठवाड्यात भीषण दुष्काळ त्यामुळं शेतात पाणी नाही,हाताला काम नाही अशी अवस्था असायची त्यामुळं हि कुटूंब 4 पैसे मिळतील म्हणून मराठवाड्यातून स्थलांतर झाली आहेत. प्रत्येक कुटुंबात २ किंवा ३  लहान मुलं सोबत आहेत  गावी कोण नसल्यामुळं ह्या मुलांना सोबत घेऊन येत आहेत कोणाच्या भरवस्यावर सोडायचं गावी  अस ह्या कुटूंबातील व्यक्ती सांगतात हि सर्व मुलं १५ वर्षाच्या आतील आहेत. त्यामुळं ह्या मुलांना स्थलांतर झाल्यामुळं  शिकता येत नाही.काही। ठिकाणी साखर शाळा आहेत पण त्या व्यवस्था नसल्यामुळं बंद आहेत. हा सर्वे करतांना ह्या मुलांना शिकण्याची खूप इच्छा आहे परंतु वेळेअभावी शाळेत जाता येत नाही सकाळी लवकर पहाटे ३ वाजता उठून उसाच्या फडात जायचं परत यायला 2 वाजतात. ह्या मुळे शालेत जाता येत नाही त्यामुळं सामाजिक क्षेत्रात काम करीत असलेल्या समाजसेविका आश्विनी राठोड मॅडम यांनी ठरवलं कि आपण स्वतःहा ह्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा आणि मग आज सर्वे करत असतांना सर्व मुलांची आणि त्यांच्या आई वडिलांची मागणी आहे लवकर शाळा चालु करा मुलांना वह्या पेन पुस्तक नाहीत तुम्ही देता का असं हि मुलांची आई वडील विचारतात ,लवकरच ह्या मुलां साठी दुपारी 3वाजता  ची शाळा त्यांच्या जवळच सुरु करत आहोत.
सर्वे करतांना समाजसेविका आश्विनी राठोड मॅडम, साहेबराव परबत, विकास वायकुळे सर, महोन चव्हाण  सर यांनी सहकार्य केलं आपल्या सर्वांची मदत आणि सहकार्य हवं आहे ह्या मुलांच्या भविष्यासाठी ,शिक्षणासाठी आज सहकार्य कराल उद्याचा युवक घडवाल….
…✍ साहेबराव भारत परबत
संवाद: ९६०४२४३०४१