११११  दिव्यांच्या प्रज्वलनात कळंबोलीत साजरा झाला दिवाळी दिपोत्सव

बाळकडू | गणेश पवार-मावळ लोकसभा प्रतिनिधी.
कळंबोली-दि.८/११/१८
      रोडपाली-कळंबोली दिपोत्सव व दिवाळी संध्या मधुर संगीताचा कार्यक्रम आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाळूपासून आकर्षक असा प्रतिकृती देखावा साकारण्यात आला होता.
       या कार्यक्रमासाठी ११११ दिवे(पणती), सुंदर अशा रांगोळी काढून आकर्षण तयार करण्यात आले होते.प्रथमच उत्साहात दिपोत्सव संध्या हा कार्यक्रम रोडपाली-कळंबोली पार पडला.
      या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना मा.श्री-दत्ता दळवी साहेब(शि.से.संपर्क प्रमुख उत्तर रायगड).यांनी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा,मागे काही झाले गेले विसरून जा,हत्तीच्या चालीने चाला, मागे काही घडले यावर विचार करून वेळ वाया घालवू नका.मागे बघाल तर आपली येणारी वेळ वाया जाईल, जोमाने कामाला लागा, येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये आपलेच आमदार निवडून आले पाहिजेत.
       राम मंदिरा साठी चलो अयोध्या हा नवीन नारा दिला.उध्दव साहेबांची अयोध्येतील शिवसैनिक वाट बघत आहेत.अयोध्येत उध्दव साहेबांच्या स्वागताची तयारी आत्तापासूनच चालू झालेली आहे.आम्ही सर्व पदाधिकारी व  शिवसैनिक अयोध्येत जाण्याच्या तयारीला लागलो आहोत.
      यावेळी बोलताना मा.श्री.शिरीष घरत साहेबः(शि.से.रायगड, जि.प्रमुख)यांनी असा कार्यक्रम फक्त माझी शिवसेनाच करू शकते असे विधान व्यक्त केले.
      त्याचबरोबर रायगडमधील शिवसेनेचा ढाण्या वाघ,रायगडची बुलंद तोफ, ज्यांनी शिवसेना घराघरात पोचवली असे तमाम शिवसैनिकांचे लाडके दादा मा.श्री.बबनदादा पाटील साहेबः यांनी या कार्यक्रमाबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना सांस्कृतिक कलेचा वारसा जपण्याचे काम माझी शिवसेना व माझ्या शिवसेनेतील घनश्याम नाईक यांसारखे पदाधिकारी करू शकतात असे म्हटले.यावेळी सर्व मान्यवरांनी मिळुन रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार मा.श्री.बबनदादा पाटील यांचा एकत्रीतपणे सत्कार व गौरव केला.
       या कार्यक्रमाला श्री.अनिल चव्हाण.(शि.से.समन्वयक रा.जिल्हा), श्री.दत्ता दळवी, श्री.शिरीष घरत, मा.श्री.बबनदादा पाटील साहेबः(प्रमुख सल्लागार रा.जिल्हा), श्री राजेंद्र यादव, श्री.भरत पाटील, श्री.अरुण कुरूप, श्री.रामदास शेवाळे(महानगर प्र.पनवेल) श्री.कैलास पाटील,(उप.मा.प्र.पनवेल)श्री.कृष्णा कदम, सौ.जोत्सनाताई गडहिरे, श्री.रामदास पाटील, श्री.दिपक निकम, श्री.अविनाश कोंडविलकर, श्री.सचिन मोरे संयोजक अनिल कदम ई ..व अन्य शिवसेना पदाधिकारी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.
    या दिवाळी संध्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्वतः आयोजक कळंबोली प्रभाग क्र-७चे,शि.से.वि.प्रमुख श्री.घनश्याम नाईक व कळंबोली प्रभाग क्र-७ चे, यु.से.अधिकारी श्री.शंतनू नाईक यांनी केले.
      व सुप्रसिद्ध कलाकार आर्किटेक श्री.शिरीष सावंत व त्यांचे सहकारी महेश स्वामी, जयराम डोके,रोहित नार्डेकर यांनी नियोजन केले.
     या कार्यक्रमाला विशेष सहकार्य अविनाश पाटील,विवेक गडकरी,महेंद्र पवार,साई मुळीक, रोहिदास पाटील यांनी केले.
        तसेच यापुढेही अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस श्री घनश्याम नाईक यांनी व्यक्त केला.