नामदार विजयरावजी औटी यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निघोज मधील शिवसैनिक आनंदित

बाळकडू | आनंदा भुकन (निघोज प्रतिनिधी)

बाळकडू | विजय रासकर (नगर जिल्हा प्रतिनिधी)

दि.३०/११/२०१८

पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार विजयराव औटी यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे.  या निवडीमुळे पारनेर तालुक्याला मंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. पारनेर तालुक्यातील शिवसैनिक आनंदित झाले आहेत. शिवसैनिकांनी गावोगावी प्लेक्स बोर्ड लावून नामदार औटी साहेबांचे अभिनंदन केले आहे.

निघोज शिवसेना शाखेकडून देखील आनंद व्यक्त केला असून नामदार विजयराव औटी यांना या नवीन कारकिर्दीसाठी शुभेचा व्यक्त केलेल्या आहेत. शिवसैनिक दत्ता कवाद, बबन ससाणे, बाबाजी तनपुरे,  शिवाजी लाळगे, पंधारकर, यासह निघोज गाव व गावामधील सर्व  बारा वाड्यातील शिवसैनिकांनी  आनंद व्यक्त करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.