बुलढाणा जिल्हा नवरत्न पुरस्कार सोहळा शिवसेनेच्या वतीने साजरा

(अनुप श्रीवास्तव | बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)
(तुषार पंत | बाळकडू बुलढाणा तालुका प्रतिनिधी)
*बुलढाणा जिल्हा नवरत्न पुरस्कार सोहळा शिवसेनेच्या वतीने साजरा*
बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वानुसार शिवसेना राजकारणा सोबत सामाजिक बांधिलकी म्हणून तळागाळातील गरजुंना व समस्याग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे कार्य शिवसेना करत आली आहे, त्यामुळे आजही शिवसेनेची खरी ओळख ही समाजसेवेसाठीच आहे, कार्यक्रमाचे उद्घाटन *खासदार प्रतापराव जाधव* ह्याच्या हस्ते आज दिनांक २/१२/२०१८ रविवार झाले *शिवसेनेच्या नवरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले*.

कला, साहित्य, पत्रकारिता, आरोग्य, संगित, नाट्य, समाजसेवा यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना आज गर्दे वाचनालयाच्या सभागृहात जिल्हा नवरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी* शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख *खासदार प्रतापराव जाधव* होते. कार्यक्रमाला *आमदार डॉ. संजय रायमूलकर*, *जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत*, *शांताराम दाणे*, *उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड*, भोजराज पाटील, रामदास चौथनकर, धीरज लिंगाडे, *महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे*, शिलाताई शिंपणे, गजानन मामलकर, नगर पालिका उपाध्यक्ष विजय जायभाये, गजेंद्र दांदडे व कार्यक्रमाचे *मुख्य संयोजक बुलढाणा तालुकाप्रमुख डॉ. मधुसूदन सावळे* यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजत खर्‍या अर्थाने वेगळी वाट जोपासत उल्लेखनीय काम करणार्‍यांना चालना मिळावी, या उद्देशाने या नवरत्न पुरस्कारांचे वितरण केले जाते. निवड समितीने अतिशय निपक्ष आणि पारदर्शीपणे पुरस्कारकर्त्यांची निवड केल्याचे यावेळी प्रास्ताविकातून डॉ. मधुसूदन सावळे यांनी सांगितले. *आमदार डॉ. रायमूलकर* यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन समाजाला नवी दिशा देण्याचे काम करणार्‍यांचा सन्मान करण्याचा हा सोहळा असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍यांना या पुरस्काराने निश्चितच प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

*खासदार प्रतापराव जाधव* यांनी पुढे सांगितले की, आज समाजात दुसर्‍याचे कौतुक करण्याची मानसिकता लोप पावत आहे. समाजासाठी काही चांगले काम करणार्‍या, वेगळ्या दिशेने वाटचाल करणार्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.राजकारण आणि पक्ष बाजूला ठेऊन विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा दरवर्षी घेण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातील रत्नांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवसेना नवरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यापैकी *डॉ. दिपक नागरिक*, *प्रा. एन. एच. पठाण* व *रणजितसिंह राजपूत* या पुरस्कारप्राप्त रत्नांनी मनोगत व्यक्त केले.

*योगेंद्र गणेश गुळवे* *(कला)*, *लीलाताई दिनकर जोशी* *(साहित्य)*, *कैलास दत्तात्रय कोल्हे* *(संगीत)*, *प्रा. नाजीरखान पठाण* *(शिक्षण)*, *पुनम दिनकर सोनुने* *(क्रीडा)*, *राजेंद्र कोल्हे* *(सामाजिक)*, *रणजितसिंग राजपूत* *(पत्रकारीता)*, *जिल्हा शल्य चिकित्सक* *डॉ. पंडीत* *(आरोग्य)*, *ज्ञानेश्वर जगदेवराव गायकवाड* *(कृषी)*, *डॉ. सुकेश झंवर* *(सहकार आणि बँकिंग)*, *डॉ. दीपक नागरे* *(संशोधन)*, *शाहीर गणेश गणपत कदम* *(लोककला)*, *राम मोहिते* *(लेखन)*, *मधुकर लहाने* *(समाज प्रबोधन)*, *सूर्योदय परिवार* *(विशेष कार्य)*, *गजानन कडुकार*यांना *रुग्णसेवा व नंदनवन परिवाराला अनाथ मुलांचे संगोपन* केल्याबद्दल नवरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

डॉ. मधुसुदन सावळे आणि नवरत्न पुरस्कार संयोजन समितीने स्वत:हून लोकांच्या कामाची दखल घेत पुरस्कार दिल्याबद्दल नवरत्न पुरस्कार विजेत्यांनी डॉ. सावळे आणि पुरस्कार संयोजन समितीचे आभार मानले. चंद्रशेखर जोशी यांनी या सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले व शेवटी राष्ट्रगीताने सत्कार समारोहाचा समारोप करण्यात आला.