गुरुनाथ पाटील शहर प्रमुख शिव सेना यांच्या नेतृत्वाखाली गरीब,गरजु व अनाथांना, तसेच अदीवासी बांधवांसाठी ” एक हात मदतीचा ” उपक्रम

एक हात मदतीचा ( शिव सेना )
श्री.गुरुनाथ लिलाधर पाटील मा.शहर प्रमुख शिव सेना.व मा. सरपंच खारघर यांच्या नेतृत्वाखाली गरीब,गरजु व अनाथांना, तसेच अदीवासी बांधवांन साठी ” एक हात मदतीचा ” हा उपक्रम शिव सेनेच्या माध्यमातून जय महाकाली महीला मंडळ यांच्या प्रयत्नाने ” एक हात मदीतीचा ” म्हणून या उपक्रमा अंतर्गत फुल ना फुलाची पाकळी म्हणुन स्वेटर्स, ब्लॅंकेट , व ज्यांना कोणाला दानं करावयाची इच्छा असल्यास त्या दानशूर व्यक्तींनी जय महाकाली महीला मंडळ ( खारघर ) यांना दिनांक ०१/१२/२०१८ ते १५/१२/२०१८ या कालावधीत  संपर्क करावा असे आवाहन श्री.गुरुनाथ पाटील यांनी ” एक हात मदतीचा ” या उपक्रमा अंतर्गत केले आहे .
श्री.नंदु वारुंगसे
बाळकडू वृत्तपत्र ( पनवेल प्रतिनिधी )