शिक्षक परिवर्तन आघाडीचे प्रा.प्रकाश डवले सर यांचा शिवसेनेत प्रवेश… *मा.उध्दवजी ठाकरे यांनी बांधले शिवबंधन !*

अकोला ; दि ३ डिसेंबर
गत २५ वर्षा पासून अमरावती विभागात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रकाश डवले सर यांनी मा.आमदार गोपीकिशनजी बाजोरिया व आमदार विप्लवजी बाजोरिया यांचे नेतृत्वात शिवसेनेत यापूढे कार्य करण्याचा मानस व्यक्त केला. त्यानुसार त्यांनी ३डीसेंबर रोजी मा.शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दवजी ठाकरे यांचे हस्ते  अकोला विमानतळ येथील विश्रामगृहात शेकडो शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपल्या सर्व युवक,युवती, शिक्षक,पदविधर आणि समर्थक कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश घेतला.मा.शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी प्रकाश डवले सरांना शिवबंधन बांधले व आशिर्वाद दिले.प्रकाश डवले सरांनी आज पर्यत शैक्षणिक क्षेत्रात २५हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांचे हजारो विद्यार्थी शासकीय,निम शासकीय व व्यवसायीक क्षेत्रात कार्यरत आहेत.८०टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण या मा.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उक्तीने प्रेरीत होऊन शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला.आणि भविष्यात शिवसेनेचे जेष्ठ आमदार मा.गोपीकीशनजी बाजोरीया व आमदार विप्लव बाजोरीया यांच्या मार्गदर्शनात
मा. श्रीरंग दादा पिंजरकर
मा राजेशजी मिश्रा (शिवसेना शहरप्रमुख)
मा संतोषजी आनासने (शहर संघटक)
मा मुकेश मुरूमकार  (उपजिल्हाप्रमुख )
मा तरुण बगेरे
मा श्रीप्रभू चापके
मा विठ्ठल सरप पाटील (जिल्हा प्रमुख युवासेना
मा योगेशजी बुंदेले (उपजिल्हाप्रमुख)
मा दीपक बोचरे (उपजिल्हाप्रमुख)
मा सोनू वाटमारे (उपजिल्हाप्रमुख)
मा.राहुल रामभाऊ कराळे (उपजिल्हाप्रमुख)
मा नितीनजी मिश्रा (शहरप्रमुख)
मा निखिलसिंग ठाकूर (जिल्हा समन्वयक )
मा अभिजीत मुळे पाटील (जिल्हा सचिव )
मा योगेश गीते,मा गजानन चव्हाण (नगरसेवक)
यांच्या मार्गदर्शनात सर्वांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करण्याचा मनोदय व्यक्त केला.या प्रसंगी सौ.मृणाली डवले,कु.चेतना बगडीया,पवन दुबे, निखिल चांडक, विशाल बोरकर, पवन मेहसरे, सागर लोखंडे यांचेसह प्रकाश डवले सरांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.यावेळी शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी,नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंदकुमार बहुरूपे
बाळापूर तालुका प्रतिनिधी बाळकडू
9923643346