सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांचा सर्व पक्षीय सत्कार !

बाळकडू | स्वप्नील सोनवणे
जळगाव- धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे राज्याचे सहकार राज्यमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांचा नुकताच सर्व पक्षीय सत्कार करण्यात आला.धरणगाव येथील पद्मश्री भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात कॉग्रेसचे नेते डी जी पाटील व राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन यांच्या हस्ते ना.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,विघापीठचे सिनेट सदस्य प्रा.डी आर पाटील,माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,डॉ मिलींद डहाळे, जी.प.चे.जानकीराम पाटील,भगवान महाजन,प्रा.बी एन चौधरी,ज्येष्ठ नेते भदाणे गुरुजी,शरदकुमार बन्सी,नगराध्यक्ष वासुदेव चौधरी,अॅड.शरद माळी,भागवत चौधरी,वाल्मिक पाटील,आर एच पाटील,नंदु पाटील,योगेश पाटील,अजय चव्हाण,सुरेश महाजन,धीरेंद्र पुरभे,चेतन जाधव,बुट्या पाटील,राहुल रोकडे,जयेश महाजन आदी उपस्थीत होते.