बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समिती शेतीमालाच्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचे उदघाटन

बाळकड़ू/ बुलडाणा जिल्हा
    बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज दि ४/११/२०१८ रोजी नाफेड  व रुझ ऍग्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उडीद, मुग या शेतीमालाच्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचे उदघाटन
 मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सभापती कृउबा समिती बुलडाणा यांच्या हस्ते पार पडले, यावेळी महाराष्ट्र अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री अजय  उमाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती, शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे प्रतिपादन यावेळी सभापती यांनी केले.
       यावेळी उप सभापती पंजाबराव पाटील, कि से उप जि प्र लखन गाडेकर, संचालक भगवान शेळके, प्रभाकर काळवाघे, संजय गाढे,उत्तम कन्नर, सचिव वनिता साबळे, शेतकरी बांधव, व्यापारी,मापारी हमाल, तसेच बाजार समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.!
बाळकड़ू
अनुप श्रीवास्तव
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि
9822834485