वाई येथे कृष्णानदीच्या काठावर श्री. महागणपती मंदिरात महाआरती

( श्री. किशोरकुमार गांधी , सातारा जिल्हा प्रतिनिधी यांचेकडून )
       वाई :- प्रभु रामचंद्रांचे मंदिर निर्माण करण्याचे आश्वासन विसरलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शनिवार दि:- २४/११/२०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सायं :- ६.०० वाजता महाआरतींचे नियोजन होते. वाई येथे कृष्णानदीच्या काठावर श्री. महागणपती मंदिरात महाआरती घेण्यात आली. यामध्ये शेकडो शिवसैनिकांसह वाईकर नागरिक , युवा आणि महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. महागणपती घाटावरील आरतीसोबत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हळदी-कुंकू घेऊन वाण वाटप करण्यात आले.
       अयोध्येत शरयू नदीच्या काठावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शनिवारी संध्याकाळी महाआरती केली. वाई या दक्षिणकाशीमध्ये गणपती घाट येथील आरती झाल्यावर शिवसैनिकांनी शहराच्या मध्यवर्ती किसनवीर चौकातही आरती घेण्यात आली. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हासंघटिका सौ. शारदाताई जाधव , युवासेना जिल्हा अधिकारी रणजीतदादा भोसले , जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. महेशराव शिंदे , वाई-खंडाळा संपर्क प्रमुख श्री. शिवाजीराव कदम , महिला आघाडी सहसंपर्क संघटिका वर्षा जाधव , संभाजीराव सपकाळ , अनिल शेंडे , दिलीप पवार , सौ. कोमलताई गांधी , नारायण सणस , रेखाताई बाबर , पांडे गावच्या महिला सरपंच रेखाताई जाधव , अमोल कोंढाळकर , किरण काळे , सचिन गोळे , आशिष पाटणे , अशोक खंडजोडे , आनंदा वाडकर , विवेक भोसले , गणेश जाधव , किरण खामकर , योगेश चंद्रस , पंकज शिंदे , स्वप्नील भिलारे , आरती सणस , चित्राताई कोंढाळकर , शालन कळंभे , अमृता काकडे , हेमा जाधव , रुपाली जाधव , रमा केसकर , माया चौधरी , प्रतिभा हगवणे , वैशाली पवार , कोरेगाव ता. महिला आघाडी संघटिका उज्वलाताई भोसले ,        महाबळेश्वर माजी जिल्हा संघटिका लिलाताई शिंदे , तालुका संघटिका लक्ष्मीताई मालुसरे , शहर संघटिका वनिता जाधव , नितीन पानसे , संतोष पोफळे , बाळकडू जिल्हा प्रतिनिधी किशोर गांधी , सोमनाथ अवसरे , गणेश किर्दत , आप्पा शिंदे , किशोर प्रभाळे ,         अतुल भाटे , श्रीकांत सोनावणे , आनंद पटवर्धन , संदीप साळुंखे , अक्षय खाडे , रमेश पुजारी , प्रथमेश चक्के , अश्विन भिंताडे , राजू सोडमिसे ,             यांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाआरती घेण्यात आली.
        सदर महाआरतीस महिलांची संख्या उल्लेखनीय स्वरूपाची होती.