शिवसेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा इचलकरंजीमध्ये झंजावती दौरा.

बाळकडू प्रतिनिधी- संतोष चव्हाण
पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत नव्यानेच प्रवेश केलेले माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे चिरंजीव कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष श्री.धैर्यशील माने यांना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून निश्चित करून पक्ष प्रवेश दिला आहे.त्यांच अनुषंगाने श्री.धैर्यशील माने यांनी पक्ष प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवसापासून मतदारसंघात संपर्क दौरा सुरू केला आहे आणि त्यांना जनतेमधून मोठा प्रतिसादही मिळत आहे.
आज इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयला त्यांनी भेट दिली त्यावेळी शहरप्रमुख सयाजी चव्हाण आणि उप जिल्हाप्रमुख महादेव गौड यांनी त्यांचा फेटा बांधून आणि शाल,श्रीफळ देउन सत्कार केला.तसेच सर्व पदाधिकारी यांनीही पक्ष प्रवेशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर इचलकरंजी येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक राष्ट्रगीत कार्यालयला भेट दिली तसेच दैनिक महासत्ता कार्यालयला,सकाळ कार्यालयलाही भेट दिली.सर्व भेटीनंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी शिवसेना प्रवेशाचे स्पस्टिकरण आणि निवडणूक लढवण्याची वाटचाल सांगितली.
यावेळी शिवसेना उप-जिल्हा प्रमुख महादेव गौड (आण्णा), शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, मलकारी लवटे,महेश बोहरा,उप-शहरप्रमुख बसय्या स्वामी,राजू आरगे,अजयकुमार पाटील,संतोष गौड, अजय घाटगे,शीतल मगदूम,आण्णा शट्टी,भीमराव अनुसे,सर्वेश भिडे,विनायक पोवार,विद्याधर पवार, शिवानंद हिरेमठ, सूरज लाड, यांच्यासह भागातील आणि परिसरातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.