पारनेरच्या श्री ढोकेश्वर विद्यालयामध्ये तालुका स्तरीय ४४ वे विज्ञान-गणित प्रदर्शन संपन्न

बाळकडू /किरण थोरात (विधानसभा प्रतिनिधी)

श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी ढोकेश्वर व पंचायत समिती (शिक्षण विभाग) व विज्ञान-गणित अध्यापक संघटना, पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वे विज्ञान गणित, पर्यावरण व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शन श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उदघाटन सोमवार दि. ३/१२/२०१८ रोजी मा. नामदार विजयराव भास्करराव औटी यांच्या  उपस्थित झाले. तरी  या कार्यक्रमाचा समारोप समारंभ ५/१२/२०१८ रोजी संपन्न झाला . शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोकशेठ कटारिया (संचालक, बाजार समिती)   यांच्या अध्यक्षतेखाली हा समारोप समारंभ पार पडला. यावेळी सन्माननीय प्रमुख पाहुणे  म्हणुन  पंचायत समितीचे सभापती मा. राहुलभैय्या झावरे,अॅड. बाबासाहेब खिलारी, दिनेश बाबर (पं. स. सदस्य ), मा.प्रविणचंद्र गुंजाळ (अध्यक्ष विज्ञान-गणित शिक्षण संघटना, पारनेर), बाबासाहेब बुगे (गट शिक्षणाधिकारी, पारनेर) प्राचार्य शिवाजीराव अभिनव (श्री ढोकेश्वर विद्यालय), सोपान गवते (सचिव विज्ञान-गणित शिक्षण संघटना, पारनेर), व सर्व विस्तार शिक्षण अधिकारी, सर्व अध्यक्ष पदाधिकारी, सर्व प्राथमिक व माध्य. शिक्षण संघटना पारनेर तालुका, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रदर्शनात ३०० पेक्षा जास्त उपकरणे  प्रदर्शित केले होते. व ५००० पेक्षा जास्त  विद्यार्थ्यांनी व लोकांनी प्रदर्शन पाहायला सहभाग घेतला होता. आणि कार्यक्रमाच्या शेवटी  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.