शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसंदर्भात पंढरपुर मध्ये नियोजन बैठक

बाळकडू | साहेबराव परबत

सोलापूर,ता.६ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २४ डिसेंबर ला पंढरपुर येथील एस टी बसच्या मैदानावर सभा होणार आहे सभा यशस्वी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसत आहे
सोलापूर जिल्ह्याचे समनवय्क शिवाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली
या सभेला राज्यभरातून शिवसैनिक येणार आहेत  दहा लाख शिवसैनिक येतील असा अंदाज आहे त्या दृष्टीने सभेचे ठिकाण हेलिपँड पार्किंग निवास व्यवस्था ह्या वरती चर्चा आणि पाहणी करण्यात आली या वेळी संपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील ,पंढरपुर विभाग सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे ,उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख  आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते