महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपक्रम शिवसेनेच्या वतीने पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी अल्पोपहार वाटप केले.

श्री.नंदु वारुंगसे
बाळकडु वृत्तपत्र ( पनवेल प्रतिनिधी)
दि.६/१२/२०१८ :- महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कातील चैत्यभूमीवर मोठया संख्येने हजेरी लावली. मुंबईकडे जाणाऱ्या अनुयायाकरीता शिवसेनेच्या वतीने  पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी अल्पोपहार वाटप केले .हजारो भिमसैनिकांनी  या सेवेचे लाभ घेत या उपक्रमाचे कौतुक केले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या  मुंबई महापालिकेच्या वतीने विशेष सोय करण्यात येतेच त्याचबरोबर ठिकठिकाणी  स्टाॅल लावण्यात येते. पनवेल-सायन महामार्गावर कामोठे टोल नाका येथे शिवसेनेच्या वतीने स्टाॅल लावण्यात आले होते. त्या ठिकाणी  पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून येणाऱ्या अनुयायांना अल्पोपहार आणि पाणी वाटप करण्यात आले.महानगप्रमुख रामदास शेवाळे यांनी हा उपक्रम राबविण्याकरीता पुढाकार घेतला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरिष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, ज्योत्सना गडहिरे, कळंबोली शहरप्रमुख अविनाश कोंडीलकर, उपमहानगर संघटक अॅड श्रीनिवास क्षिरसागर,कृष्णकांत कदम, सचिन मोरे, सुभाष जाधव, विश्वास पेठेकर यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री.नंदु वारुंगसे
बाळकडु वृत्तपत्र (पनवेल प्रतिनिधी)