शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे* *यांच्या प्रेरणेतून यवतमाळ जिल्ह्यातिल शिवसैनिकांनी दिला “गरिबाला मदतीचा हाथ”

बाळकडू | संतोष चव्हाण

यवतमाळ जिल्ह्यातिल  महागाव व ऊमरखेड तालुक्यात शिवसैनिकांनी नुकत्याच आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटी दिल्या.त्यामधे महागाव तालुक्यातील आमनी खुर्द,भांब,चिल्लि इजारा,धारेगाव,वडद ,हिवरा,पोहंडुळ,वागद,व माळकिन्ही  तर ऊमरखेड तालुक्यातील बेलखेड ,मार्लेगाव,सावळेश्वर,अकोली,निंगनुर,व घमापुर या गावांचा समावेश आहे. *आप्तस्वकीयांचा मृत्यू  अत्यंत दुःखदायक असतो* .घरातला कर्ता पुरुष   अचानक ध्यानीमनी नसताना हे   जग सोडून जातो तेव्हा त्या कुटुंबाच्या वेदना दुसर  कुनिहि जानवु शकत नाही, संपुर्ण  कुटुंब ऊघड्यावर पडते.
तसं पाहिलं तर जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. प्रत्येकाला आपला जीव अत्यंत  प्रिय असतो,
अस असूनही  गरीबी ,सततची नापिकी ,दुष्काळ, कर्जबाजारीपणा शेतमालाला अपुरे भाव व रात्रंदिवस शेतात राबूनही कुटुंबाच्या गरजा भागवु शकत नाही या जानीवेतुन अनेक  शेतकरी टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या करतात व त्यांच्या पश्चात कुटुंबाची मात्र वाताहात होते.  काही आत्महत्याग्रस्त कुटुंबाना सरकारी मदत मिळत असेलही परंतु जिवाचे मोल पैशात करता येत नाही.   बऱ्याच आत्महत्या विविध कारणामुळे सरकारी मदतीसाठि अपात्र ठरवल्या जातात.
*शिवसेना पक्षप्रमुख माननीय  उद्धव साहेब ठाकरे* *यांच्या प्रेरणेतून मा. संजय भाऊ राठोड व जिल्हा शिवसेनाप्रमुख मा. परागभाऊ पिंगळे व सहसंपर्क प्रमुख मा.प्रकाश पाटील देवसरकर* यांच्या आदेशाने महागाव व उमरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना फुल ना फुलाची पाकळी म्हणुन    अल्प का होईना मदत करावी म्हणून *शिवसेनेतर्फे*
दोन महिने पुरेल एवढे राशन गहू ,तांदूळ, साखर, तेल  इत्यादी सामान घरपोच  नेऊन देण्याची संधी मिळाली.त्यानिमित्ताने आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे दुःख व वेदना अगदी  जवळून पाहावयास मिळाले.
बर्‍याच कुटुंबांची परिस्थिती अत्यंत विदारक  आहे .  त्यांची राहते घरे मोडकळीस आलेली आहेत. त्यांना अजून घरकुले मिळालेले नाहीत.
*घरकुलांच्या बाबतीत आपण पेपर मधे वाचतो किंवा जाहिरातित बघतो त्यापेक्षा परिस्थिति अत्यंत वेगळी आहे*.
आम आदमी विमा असो किंवा अजुन कोनताही विम‍ा असो सर्व योजना कागदावरच आहेत.सर्व सामान्या्ंना व गरजुंना त्याचा काहि लाभ मिळत आहे अस काही दिसुन आले नाही.
*नियती किती क्रूर असू शकते याचे उदाहरण वागद येथील  संतोष प्रल्हाद पवार ह्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची परिस्थिती पाहिल्यावर लक्षात येते. या कुटुंबाचे मोडकळीस आलेले  घर व एकंदर दु:ख पाहुन डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत .संतोष प्रल्हाद पवार यांच्या पत्नीचे एक  वर्षापुर्वच  आजारी पडुन निधन झाले   .पत्नीच्या निधनाचे दुःख ,नापिकी व कर्जबाजारीपणामुळे संतोष ने ही जानेवारी महिन्यात आत्महत्या  केली ,आई वडिलांचे छत्र गमावल्यामुळे  त्यांची दोन चिमुकली निरागस बालके ६वि त शिकणारा मुलगा व ७वि त शिकणारी मुलगीअगदी उघड्यावर पडली  आहेत.अशी अवकृपा पुन्हा कोनावरही करु नकोस अशी भगवंतास प्रार्थना .त्या अबोध बालकांची केविलवाणी परिस्थिती बघून व त्यांच्या डोळ्यातील  भाव बघून आपल्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत .त्यांचे वृद्ध आजी आजोबा मुलांचे संगोपन व शिक्षण करीत असले तरी आर्थिक विवंचनेमुळे त्यांना खूप मर्यादा आहेत. शासनाने या मुलांच्या शिक्षणाकरीता काहीतरी करण्याची गरज आहे. तसेच समाजातील सह्रदई दानशूर व्यक्तींनी या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे.*
*त्याचप्रमाणे घमापुर येथील प्रविन रामा जाधव या एकोणीस वर्ष वयाच्या मुलाचे  वडिल रामा जगराम जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली व कालच त्याच्या आईचे फ्लोराइड मुळे दोन्ही मुत्रपिंड (किडनी)निकामी झाल्यामुळे दुःखद निधन झाले त्यामुळे अल्पवयातच त्याच्यावर त्याच्या छोट्या बहिणीची जबाबदारी आली* .या भागामध्ये  पिण्याच्या पाण्यातिल फ्लोराईड मुळे जनतेचे आरोग्य धोक्यात अाले असुन किडनीच्या आजाराचे असंख्य रुग्ण आहेत.
अंशी टक्के समाजसेवा हा शिवसेनेचा मूलमंत्र आहे आणि बाळासाहेबांनी दिलेल्या या मूलमंत्रानुसारच शिवसेनेचे कार्य सुरू आहे मग ते आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या  विधवांना शिलाई मशीन वाटप असो, आरोग्यसेवा असो, कुपोषित बालकांना पौस्टीक आहार देण्याचा कार्यक्रम असो किंवा आताच्या कार्यक्रमा प्रमाणे आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना राशन देणे असो *समाजसेवेच्या बाबतीत बाकी राजकीय पक्षांच्या तुलनेत शिवसेना कोसो मिल  पुढे आहे यात शंकाच नाही*

        संतोष पाटील चव्हाण
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी