दारफळ गावातील प्राथमिक शाळेत मुलांनी भरवला आंनद बाजार

तारीख:22/12/2018

माढा तालुका प्रतिनिधी बाळकडू ! बाजीराव चव्हाण
आज रोजी माढा तालुक्यातील दारफळ गावातील अंगणवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मराठी शाळेत एक नवीन उपक्रम राबवला .शाळेतील मुलांना व्यवहारिक ज्ञान येण्यासाठी आनंद बाजार हा उपक्रम राबविण्यात आला.
त्यासाठी मुलांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते .
तर कुणी चहा चा स्टॉल लावला.कुणी भाजेपाला खाण्याचे पदार्थ कांदेपोहे पाणीपुरी असे वेगवेगळे स्टॉल लावले होते
त्या साठी पालकांनी हि चांगला प्रतिसाद दिला. गावातील लोकांनी बाजार खरेदी साठी हि चांगला प्रतिसाद दिला.
बाजार पाहण्यासाठी .माढा तालुका उपसभापती मा. बाळासाहेब शिंदे. युवासेना प्रमुख रंजीत बारबोले सरपंच सौ.शैला कांबळे. उपसरपंच औदुंबर (सर) उबाळे तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष साठे शिवाजी बारबोले  सोनाली बारबोले तसेच दारफळ मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच मुलाना मान्यवरानी बाजार व व्यवहारिक ज्ञानाबद्दल मार्ग दर्शन केले.शालेय समिती चे अध्यक्ष बालाजी बारबोले उपाध्यक्ष तुकाराम उबाळे यांनी हि परिश्रम घेतले.
कार्यक्रम व्यवस्थित केल्याबद्दल  घुमरे गुरूजी , दिपक बारबोले,कांबळे गुरूजी तसेच शाळेतील इतर कर्मचारी यांचे हि ग्रामस्थांनी आभार मानले.